संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी माजी सैनिकांसोबत बघितला 'उरी'
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :27-Jan-2019
बंगळुरू :
संरक्षण मंत्री निर्मला सीतारामण यांनी बंगळुरूतील सेंट्रल स्पिरीट मॉलमध्ये आज 'उरी : द सर्जिकल स्ट्राइक' हा चित्रपट बघितला. माजी सैनिकांसोबत त्यांनी हा चित्रपट पाहिला. सीतारमण यांनी यावेळी चित्रपटातील कलाकारांचे कौतुकही केले. चित्रपट पाहण्यासाठी माजी सैनिकांमध्येही उत्साह दिसून आला.

 
 
या चित्रपटातील कलाकारांची निर्मला सीतारामण यांनी काही दिवसांपूर्वीच भेट घेतली होती. भारतीय लष्कराच्या स्थापना दिनानिमित्त लष्कर प्रमुख बिपीन रावत यांच्या निवासस्थानी त्यांची ही औपचारीक भेट झाली होती. त्यानंतर त्यांनी ट्विट करत चित्रपटाची प्रशंसाही केली होती.
 
 
 
'उरी : द सर्जिकल स्ट्राइक' चित्रपटाचं सर्वत्र कौतुक होते आहे. अभिनेता विक्की कौशल, यामी गौतम आणि आदित्य धर यांनी रुपेरी पडद्यावर जवानांच्या भावना प्रभावीपणे मांडल्या, असे सीतारमण यांनी ट्विटमध्ये म्हंटले होते.