अटल महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :27-Jan-2019
नागपूर :   
महाराष्ट्र सरकार आणि स्व. प्रभाकरराव दटके स्मृती संस्थेच्या वतीने आयोजित अटल आरोग्य महाशिबीराचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भृपृष्ट परिवहन मंत्री श्री नितीन गडकरी यांनी आज सकाळी नागपूरमध्ये उदघाटन केले. यावेळी मंत्री श्री गिरीश महाजन, श्री चंद्रशेखर बावनकुळे आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
 

 
 
या अटल आरोग्य महाशिबिरासाठी ७० ओपीडी कक्ष स्थापन करण्यात आले असून राज्यभरातून तज्ञ डॉक्टर गरिब आणि गरजू लोकांना मदत करण्यासाठी एकत्र आले आहेत.
 
 
 
सुमारे 1 लाख रुग्णांना या महाशिबिरातून विविध लाभ मिळणार आहेत. यावेळी बोलताना मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यात अशा शिबिरांच्या आयोजनातून संपूर्ण राज्यातील लाखो नागरिकांना फायदा होत आहे.
 
आयुष्मान भारत आणि महात्मा फुले जनारोग्य योजनेच्या माध्यमातून गरिब आणि गरजूंना सामाजिक सुरक्षितता प्राप्त झाली आहे. मुख्यमंत्री सहायता निधीतून सुद्धा मोठ्या प्रमाणात मदत दिली जात आहे. राज्यभरातील नागरिकांना सुमारे ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त मदत आतापर्यंत प्राप्त झाली आहे.