जगात इलेक्‍ट्रॉनिक कचऱ्याच्या निपटाऱ्याची आवश्‍यकता
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :27-Jan-2019
दाव्होस : 
जगासमोर आता इलेक्‍ट्रॉनिक कचरा ही एक नवी गंभीर समस्या आगामी काळात निर्माण होणार असून, त्यामुळे एक सर्वात मोठे ओझे सहन करावे लागणार असल्याचे मत वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या मंचावर व्यक्त करण्यात आले आहे. आपले आरोग्य आणि पर्यावरण यांच्यासाठी ही सर्वात गंभीर समस्या निर्माण होणार असल्याची भीती या संमेलनात सादर करण्यात आलेल्या एका अहवालातून व्यक्त केली आहे.

 
 
वर्षाला आपण पाच कोटी टन ई कचऱ्याची निर्मिती करत असून तो आगामी काळात वाढत जात १२ कोटी टन या टप्प्यावर पोहोचणार असल्याचा अंदाज मांडण्यात आला आहे. हा कचरा जगभरात आतापर्यत प्रवासी विमानाची निर्मिती केली आहे. त्याच्याहून अधिक ई-कचरा निर्माण होत आहे.
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम वार्षिक संमेलनात संयुक्त राष्ट्र ई-कचरा व्यवस्थापन यांच्यासह सादर करण्यात आलेल्या अहवालात या विषयावर विस्ताराने चर्चा घडवून आणली आहे.
कचऱ्याचे मूल्यमापन करण्यात आल्यावर प्रतिवर्षी ६२ अब्ज डॉलर पर्यंत ई-कचऱ्याची निर्मिती होत असल्याचे अनुमान असून जगभरातील चांदी उत्पादनाशी तुलना केल्यास हे तीन पट असल्याचे नोंदवले आहे.