विंडीजचा जेसन होल्डरअव्वल कसोटी अष्टपैलू
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :27-Jan-2019
ब्रिजटाऊन : 
 
इंग्लंडविरुद्ध संघाच्या शानदार प्रदर्शनाच्या जोरावर ३८१ धावांनी मोठा विजय मिळवून देणारा वेस्ट इंडीजचा कर्णधार जेसन होल्डर जगातील अव्वल क्रमांकाचा कसोटी अष्टपैलू खेळाडू बनला आहे.
 
 
 
ब्रिजटाऊन येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात होल्डरने नाबाद द्विशतक झळकावले व २ बळीसुद्धा टिपले होते. होल्डरला आयसीसी कसोटी संघ २०१८ मध्येसुद्धा सहभागी करून घेतले होते. होल्डरच्या नेतृत्वाखालील विंडीज संघाने इंग्लंडचा पहिला डाव ७७ धावात, तर दुसरा डाव २४६ धावातच गुंडाळला होता.
 
होल्डरने या सामन्यात नाबाद २०२ धावांची खेळी केली होती. त्याने जो रूट व किटॉन जेनिंग्स हे दोन महत्त्वपूर्ण गडीसुद्धा बाद केले. त्याच्या या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर त्याने कारकीर्दीतले सर्वोत्तम ४४० गुण संपादन केले.
कसोटी अष्टपैलू खेळाडूंच्या मानांकनात शाकिब अल हसन ४१५ गुणांसह दुसर्‍या, तर भारताचा रवींद्र जडेजा ३८७ गुणांसह तिसर्‍या क्रमांकावर आहे.