शिक्षकांना कोणतीही शाळाबाह्य कामे सांगू नका : उच्च न्यायालय
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :27-Jan-2019
नवी दिल्ली :
 
दिल्‍ली उच्च न्यायालयाने एक महत्‍वाचा निर्णय दिला असून, त्यानुसार प्राथमिक शिक्षकांकडून शाळा बाह्य काम करुन घेण्यास निर्बंध घातले आहेत. महानगरपालिका क्षेत्रातील प्राथमिक शिक्षक आणि मुख्याध्यापकांना कोणतीही शाळा बाह्य कामे सांगता येणार नाहीत असेही सांगितले आहे. 
 
 
 
न्यायमूर्ती सी. हरिशंकर यांनी महानगरपालिकेकडून देण्यात आलेल्या सूचना रद्द केल्या आहेत. ज्या मुख्याध्यापक, प्राचार्य यांना सांगण्यात आले होते की, शहरातील प्रत्येक घरात जाऊन सर्वेक्षण करून शैक्षणिक अहवाल तयार करावा, या प्रक्रियेमध्ये भाग घ्यावा. याबाबत न्यायालयाकडून स्‍पष्ट करण्यात आले आहे की, शाळेतील विद्यार्थ्यांची बँक खाते काढण्यासाठी आणि आधार कार्ड लिंक जोडण्यासाठी शिक्षकांची मदत घेणे योग्य असले तरी ते त्यांची मदत घेणे सक्‍तीचे होऊ शकत नाही. शिक्षकांनी मदत केली नाही म्‍हणून त्यांच्यावर कारवाई करण्याचाही अधिकारही कोणाला नसल्याचे न्यायालयाने स्‍पष्ट केले आहे.
न्यायालयाकडून हा निर्णय देण्यापाठीमागे काही महत्‍वाची कारणे कारणीभूत आहेत. अलिकडच्या काळात शिक्षकांकडून अनेक शाळाबाह्य कामे करून घेतली जात आहेत. या कोणत्‍याही कामांचा शैक्षणिक क्षेत्राशी संबंध नाही. यामुळे न्यायालयाकडून हा निर्णय देण्यात आला आहे.
दिल्‍लीतील प्राथमिक शिक्षक संघटनेच्या मागणीवरुन दिल्‍ली उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. दिल्‍लीतील महानगरपालिका क्षेत्रातील प्राथमिक शाळेतील शिक्षकांची संघटना आहे. त्यांनी शिक्षणबाह्य कामे न देण्याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.