देशाचा विश्वासघात करणाऱ्यांना सोडणार नाही: नरेंद्र मोदी
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :27-Jan-2019
चेन्नई : 
 
मदुरैमध्ये एका सभेला ते संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा विश्वासघात करून, देशातील विविध बँकांचे पैसे बुडवून देशाबाहेर पळून जाणाऱ्यांना अजिबात सोडणार नसल्याचा इशारा दिला आहे. 
देशाचा पैसा बुडवून पळून जाणाऱ्या आर्थिक गुन्हेगारांवरही मोदींनी सडकून टीका केली आहे. मेहूल चोक्सी, विजय मल्ल्या यांचा स्पष्ट उल्लेख करत मोदी म्हणाले की,' देशाचा विश्वासघात करून पळून जाणाऱ्यांना अजिबात सोडणार नाही. देशाचे पैसे लुटणाऱ्यांना आम्ही शिक्षा देऊ' .
 
 
 
आर्थिक दृष्ट्या मागासांना मिळणाऱ्या आरक्षणाचा विरोध करणाऱ्या डीएमकेवरही त्यांनी सडकून टीका केली. ' वैयक्तिक फायद्यासाठी तामिळनाडूतील काही लोक अविश्वासाचे आणि संभ्रमाचे वातावरण तयार करत आहेत.' केंद्राने दिलेल्या सवर्ण आरक्षणाविरोधात डीएमकेने मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
 
तसेच यावेळी मोदींनी आपल्या सरकारच्या कामाचा आलेख जनतेसमोर मांडताना ,स्वच्छतेच्या क्षेत्रात ग्रामीण भारतात अनेक काम झाली असून देशभर ९ कोटी शौचालये बांध असल्याचा उल्लेखही त्यांनी केला आहे. मदुरैत भाषण केल्यानंतर मोदी केरळात सभांना संबोधित करण्यासाठी रवाना झाले आहेत.