युतीची वाट पाहू नका, कामाला लागा : मुख्यमंत्री फडणवीस
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :28-Jan-2019
जालना :
युतीची वाट पाहू नका, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कामाला लागा असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जालना येथील भाजप कार्यकारिणीच्या बैठकीतून दिला. विरोधकांनी कितीही आकांडतांडव केला, तरी जनता भाजपासोबतच आहे हे निवडणुकीतून समोर आले आहे असे सांगत त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

 
 
मुख्यमंत्री म्हणाले की, भाजपाविरोधात अनेक राजकीय पक्ष एकत्र येत आहेत, या पक्षांकडे नीती नाही, नियम नाही धोरण नाही. मोदी हटाव हे एकच धोरण या पक्षांकडे आहे. कारण मोदी निवडून आले तर अस्तित्त्व संपेल अशी भीती या सगळ्यांना वाटते आहे. या भीतीपोटीच विरोधक एकत्र आले आहेत. यांच्यापुढे देशाचा विकास हे ध्येय नाही. कितीही विरोध दर्शवला, तरी मोदी हटाव मोहीम यशस्वी होणार नाही असेही मुख्यमंत्री म्हणाले.