किंग खान ‘आऊट’ तर विकी कौशल ‘इन’
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :28-Jan-2019
मुंबई : 
चंद्रावर प्रथम पाउल ठेवणारे राकेश शर्मा यांच्या आयुष्यावर आधारित बायोपिक बनत आहे. सर्वांना हेच माहित आहे की यामध्ये शाहरुख खान मुख्य भूमिका साकारणार. मात्र बीटाऊनमधून आताच आलेल्या बातमीनुसार शाहरुख खान नाही तर मसान चित्रपटातून पदार्पण करणारा अभिनेता विकी कौशल हा ही भूमिका करू शकतो.
 
 
 
सारे जहा से अच्छा असे सिनेमाचे नाव आहे. ही भूमिका यापूर्वी अमीर खान करणार होतं. मात्र आमीरने स्वतः ही भूमिका शाहरुख चांगली निभावू शकेल असे सांगत सिनेमा सोडला. शाहरुखने तो आनंदाने स्वीकारला. मात्र आता सारे जहा से अच्छा च्या मेकर्सने शाहरुखचा पट्टा कट करत विकीची निवड केली असल्याचे समजते आहे. सध्या विकी कौशलचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गल्ला जमवत असून तो सर्वांचाच आवडता कलाकार बनला आहे. नुकताच आलेला उरी या चित्रपटाने सर्वांचीच कौतुकाची थाप मिळवली आहे.