रोहित शेट्टीच्या चित्रपटात आता सलमान बनणार पोलिस अधिकारी
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :28-Jan-2019
मुंबई :
बॉलीवूडमधील सध्या एकापेक्षा एक हिट सिनेमे देणारा दिग्दर्शक म्हणजे रोहित शेट्टी. त्याच्या सिनेमात अजय देवगण, शाहरुख खानपासून रणवीर सिंहने काम केले आहे. मात्र अजूनही त्याने सलमान खानसोबत काम केलेले नाही.  बोललीवूडमध्ये सध्या अशी चर्चा आहे की, रोहित शेट्टी किक चित्रपटाच्या सिक्वेलचे दिग्दर्शन करणार आहे.
 
 
 
किक च्या पहिल्या भागाच्या शेवटी सलमान पोलिसाच्या भूमिकेत येतो असे दाखवण्यात आले होते आणि तेथेच चित्रपट संपतो. आता पुढच्या भागाची जबाबदारी रोहितवर असल्याचे दिसते आहे. या भागात सलमान पोलीस अधिकाऱ्याची भूमिका निभावणार आहे. लवकरच याची अधिकृत घोषणा होईल. सलमान आणि रोहित एकत्र आले तर नक्कीच तो ब्लॉकबस्टर हिट ठरणार यात शंका नाही.