नेपाळच्या ‘या’ खेळाडूने मोडला सचिनचा विक्रम
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :28-Jan-2019
दुबई :
 
नेपाळचा युवा खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये सर्वात कमी वयात अर्धशतक झळकावण्याचा मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आहे. नेपाळच्या रोहित पौडेल याने संयुक्त अरब अमिरात (यूएई) विरुद्ध खेळताना ५५ धावांची खेळी करत सचिनचा २९ वर्षापूर्वीचा विक्रम मोडला आहे.
 
 
रोहित पौडेल आतंरराष्ट्रीय स्तरावर अर्धशतक करणारा सर्वात तरूण खेळाडू ठरला आहे. रोहितचे वय १६ वर्ष १४६ दिवस इतके आहे. तर सचिन तेंडुलकरने १६ वर्ष २१३ दिवसांचा असताना २३ नोव्हेंबर १९८९ रोजी फैसलाबादमध्ये पाकिस्तानविरुद्ध ५९ धावा केल्या होत्या. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानचा शाहिद अफ्रिदी होता. त्याने आंतराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात पहिले अर्धशतक ठोकले त्यावेळी त्याचे वय १६ वर्ष आणि २१७ इतके होते.