केंद्राकडून दुष्काळग्रस्त महाराष्ट्राला ४ हजार ७१४ कोटींची मदत
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :29-Jan-2019
नवी दिल्ली : 
केंद्र सरकारने आज महाराष्ट्रासह अन्य दुष्काळग्रस्त राज्यांना ७ हजार २१४ कोटींच्या मदतनिधीस मान्यता दिली आहे. यामध्ये महाराष्ट्राला ४ हजार ७१४ कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे.
 

 
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली उच्च स्तरीय समितिची बैठक झाली. या बैठकीत नैसर्गिक आपत्तीचा सामना करणाऱ्या राज्यांना ७,२१४.०३ कोटी रुपयांची मदत मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, पुदुचेरी, आंध्र प्रदेश आणि गुजरात या राज्यांचा समावेश आहे. यात दुष्काळग्रस्त महाराष्ट्राला सर्वाधिक जास्त मदत देण्यात आली आहे. महाराष्ट्राला जवळपास ४ हजार ७१४ कोटींची मदत जाहीर केली आहे.
 
विदर्भातील दुष्काळी तालुक्यांना १,३१५ कोटींची मदत
गेल्या दोन दिवसांपूर्वी खरीप-२०१८ मध्ये राज्यात तीव्र व मध्यम स्वरूपाच्या दुष्काळ जाहीर १५१ तालुक्यांतील बाधित शेतकऱ्यांसाठी ७१०३.७९ कोटींच्या मदतनिधीस शासनाने शुक्रवारी प्रशासकीय मान्यता दिली. हा निधी दोन समान टप्प्यात वितरित केला जाईल. यामध्ये विदर्भातील ३८ दुष्काळग्रस्त तालुक्यांना १,३१५ निधी मिळणार आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात ५० टक्के निधी वितरणास मान्यता मिळाली आहे. मदतनिधीमध्ये राज्यातील दुष्काळसदृश स्थिती जाहीर केलेले २६८ महसूल मंडळांसह ९३१ गावांना डावलल्याचे स्पष्ट झाले.
 
 केंद्राकडून या राज्यांना मदत जाहीर
महाराष्ट्र - ४,७१४.२८ कोटी
कर्नाटक - ९४९.४९ कोटी
आंध्र प्रदेश - ९००.४० कोटी
उत्तर प्रदेश - १९१.७३ कोटी
गुजरात - १२७.६० कोटी
हिमाचल प्रदेश - ३१७.४४ कोटी
पुदुचेरी - १३.०९ कोटी