'गली बॉय' चे नवे गाणे प्रदर्शित
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :29-Jan-2019
मुंबई :
 
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री आलिया भट यांचा आगामी चित्रपट 'गली बॉय'चे नवे गाणे प्रदर्शित करण्यात आलं आहे. हे सुद्धा रॅप स्वरुपाचे सॉन्ग असून रणवीरनेच गायले आहे. यापूर्वी या सिनेमातील दोन गाणीआणि ट्रेलर प्रदर्शित झाले होते.
मुंबईमधील धारावीतील रॅप गायकाच्या जीवनावर आधारित 'गली बॉय' हा चित्रपट बनवण्यात आला आहे. ज्याचे २.३१ सेकंदाचे  तिसरे गाणेही प्रदर्शित झाले आहे. 'दूरी' असे या गाण्याचे नाव आहे.
 

 
 
या गाण्याला रिषी रिच यांनी संगीत दिले असून याचे बोल जावेद अख्तर आणि डिवाइन यांनी लिहिले आहेत. या गाण्यात झोपडपट्टीतील लोकांचे आयूष्य दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यू-ट्यूबवर दुरी या गाण्याला आतापर्यंत ८ लाखांच्या आसपास लोकांनी पाहिले आहे. 
'गली बॉय' हा सिनेमा रॅपर फर्नांडिज आणि नावेद शेख यांच्या जीवनावर आधारित आहे. ज्याचे दिग्दर्शन जोया अख्तरने केले आहे. 
अभिनेता रणवीर सिंहने या सिनेमासाठी खास मेहनत घेतली आहे. त्याने रॅपरकडून रॅप गायनाची ट्रेनिंगही घेतली आहे. १४ फेब्रवारी रोजी हा चित्रपट देशभरातील प्रदर्शित होणार आहे.