रंगकर्मी डॉ. राम म्हैसाळकर यांचे निधन
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :29-Jan-2019
संगीत नाटकांनी विदर्भाची रंगभूमी गाजविणारे ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. राम म्हैसाळकर यांचे मंगळवारी निधन झाले. मृत्यूसमयी ते ८९ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी कमल, शुभदा देशपांडे व अरुंधती गिरणीकर या दोन मुली व मुलगा भवन आहेत. बुधवारी सकाळी ९ वाजता २८, हिंदुस्तान कॉलनी, वर्धा रोड येथून त्यांची अंत्ययात्रा निघेल. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
 
 
 

 
 
 
डॉ. राम म्हैसाळकर हे ‘नाट्यवलय’ या नाट्यसंस्थेचे संस्थापक सदस्य होते. त्यांनी या संस्थेच्या माध्यमातून सौभद्र, मानापमान, संशयकल्लोळ, स्वयंवर आदी संगीत नाटकांचे राज्य व राज्याबाहेर अनेक प्रयोग केले होते. परीक्षक, सल्लागार म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. ‘संगीत वहिनी’, ‘दूरचे दिवे’ या नाटकांसाठी त्यांनी प्रथम पुरस्कारही प्राप्त झाले होते. त्यांच्या जाण्याने विदर्भाच्या नाट्यक्षेत्राची मोठी हानी झाली आहे.