राशी भविष्य
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :29-Jan-2019
मेष : स्वत:ची जास्त जाहिरात करत असाल तर आज ती अंगलट येण्याची शक्यता आहे. सायंकाळी देवाजवळ दिवा लावा.
वृषभ : धार्मिक कामांत आनंद मिळेल. वाहनाच्या वेगावर मर्यादा ठेवा. सकाळी उठताच कुलदेवतेचे स्मरण करा.
मिथून : समाजात वावरताना जास्त भावनिक होऊ नका. आज गायीला घास घातल्यास वेगळा अनुभव घ्याल.
कर्क : घरगुती अडलेली कामे, समस्या मार्गी लागण्याचा हा दिवस आहे. शंकराच्या पिंडीवर सकाळी फुल वहा.
सिंह : अगदी छोटेखानी प्रवासातून काम साध्य होईल. मार्गात कुणा अडलेल्या मदत करा.
कन्या : कलाक्षेत्रांत असाल तर चमकाल. काळे वस्त्र घालणे आजसाठी शुभकारक आहे.
तूळ : अनोळखी माणूस अचानक फायदा करून जाईल. पूर्व दिशेला असलेल्या मंदिरात जावून प्रार्थना करा.
वृश्चिक : प्रकृतीची काळजी घ्या. मारोतीचे दर्शन घेतल्यास आनंद मिळेल.
धनु : आर्थिक बाबतीत सावध रहा, फसवणूक होण्याची शक्यता आहे. रात्री लक्ष्मी स्तोत्र म्हणा.
मकर : अंधविश्वासाचा फटका बसेल त्यामुळे गुहित गोष्टींवर विसंबून राहू नका.
कुंभ : आज बोलताना शब्द जपून वापरा. काटेकोरांटीचे फुल बालाजीला वाहिल्यास फायदा होईल.
मीन : अग्नीपासून सावध रहा. उष्णतेचे विकार होतील. सकाळी तुळशीला पाणी घाला.