नाना पाटेकर यांना मातृशोक
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :29-Jan-2019
 
 
 
 
मुंबई: 
 
अभिनेता नाना पाटेकर यांच्या मातोश्री निर्मला गजानन पाटेकर यांचे आज मंगळवारी मुंबईतील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 99 वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर मंगळवारी सायंकाळी ओशिवरा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आला.
 
चित्रपट सृष्टीने अनेक मान्यवरांनी पाटेकर यांच्या घरी त्यांच्या मातोश्रींच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले व नानाचे सांत्वन केले. नाना पाटेकर आपल्या आईसोबत मुराड येथे राहात होते. वाढत्या वयामुळे त्यांचे स्मरणशक्ती कमजोर झाली होती. आज त्यांची प्राणज्योत मालवली तेव्हा नाना पाटेकर घरी नव्हते.