राहुल गांधींनी घेतली आजारी पर्रिकरांची भेट
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :29-Jan-2019


 
 
 
गोव्याच्या दौऱ्यादरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (दि.२९) आजारी असलेल्या मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची गोव्याच्या विधानसभेत जाऊन सकाळी भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये काही काळ चर्चा झाली. राफेल प्रकरणी पर्रिकरांकडे महत्वाची माहिती आहे, असा दावा नुकताच राहुल गांधी यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी पर्रिकर यांची भेट घेतल्याने ही भेट चर्चेचा विषय झाली आहे. 
 
 
 
 
 
राहुल गांधी यांनी ट्विट करुन आपण पर्रिकर यांची भेट घेतल्याची माहिती दिली. तसेच त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करीत लवकरात लवकर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी अशी सदिच्छा दिल्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच ही वैयक्तिक भेट असल्याचेही त्यांनी आवर्जुन सांगितले. दरम्यान, राहुल गांधी यांनी गोव्यातील काँग्रेसच्या १२ आमदारांची धावती भेट घेतली.