पबजी वर बंदी आणा ; ११ वर्षीय आहादचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :30-Jan-2019
११ वर्षाच्या मुलाने राज्य सरकारला पत्र लिहून पबजी या ऑनलाइन गेमवर बंदी आणण्याची मागणी केली आहे. आहाद असं या मुलाचं नाव आहे. आहादने राज्य सरकारला चार पानांचं पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्याने पबजी गेम हिंसेला खतपाणी घालत असल्याचं सांगत बंदी आणण्याची मागणी केली आहे.
 
 


 
 
 
पत्रात त्याने लिहिलं आहे की, ‘पबजी गेम अनैतिक आचरणाला ज्यामध्ये हिंसा, हत्या, राग, लूटमार, गेमिंग व्यसन आणि सायबर गुंडगिरी अशा गोष्टींना वाढ देत असून त्याच्यार बंदी आणली जावी’. पुढे त्याने जर गेमवर बंदी आणली नाही तर आपण कायदेशीर मार्गाने त्यासाठी प्रयत्न करु असं म्हटलं आहे.
 
आहादने या पत्रात सात नावांचा उल्लेख केला असून यामध्ये केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यासहित इतरांचा समावेश आहे. पत्रावर आहादला कोणतंही उत्तर मिळालेलं नाही यामुळे त्याने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.