अमित शाह आणि उद्धव ठाकरेंची फोनवर चर्चा
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :30-Jan-2019
मुंबई :  आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कोणत्याही परिस्थितीत राज्यात शिवसेनेसोबत युती झाली पाहिजे यासाठी भाजपा नेत्यांना जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. युतीसाठी राज्य स्तरावर प्रयत्न सुरू असतानाच आता खुद्द भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर युतीबाबत चर्चा केली आहे.

 
 
राज्यामध्ये शिवसेना आणि भाजपा हे स्वतंत्रपणे लढल्यास त्यातून होणाऱ्या मतविभागणीचा फायदा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीस  होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे शिवसेनेसोबत युती झालीच पाहिजे यासाठी भाजपा नेत्यांकडून हालचाली सुरू आहेत. त्यासाठी भाजपाकडून प्रयत्न करण्यात येत असून, आतापर्यंत स्वबळाची भाषा करण्याऱ्या शिवसेनेनेही आपली भूमिका मवाळ केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये युतीबाबत चर्चा झाली आहे. या चर्चेवेळी अमित शाह यांनी युतीबाबत लवकर निर्णय घेण्याची विनंती उद्धव ठाकरे यांना केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे हे युतीबाबत काय निर्णय घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.