अण्णा हजारे यांचे उपोषण
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :30-Jan-2019
स्रोत: Tarun Bharat, Nagpur दिनांक :30-Jan-2019
समाजसेवक अण्णा हजारे केंद्र सरकारच्या विरोधात उपोषण आंदोलन सुरू करणार आहेत. अण्णा हजारे हे आज सकाळी 10 वाजता संत यादवबाबा मंदिरात उपोषणाला सुरुवात करणार आहेत. महात्मा गांधी पुण्यतिथीपासून होणार्‍या आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन राळेगणसिद्धी येथे येणार होते.
मात्र गिरीश महाजन राळेगणसिद्धीला अण्णांच्या भेटीला येणार असले तरी अण्णांनी त्यांना भेटण्यास नकार दिला आहे. गिरीश महाजन यांच्या हातात या आंदोलनाचा तोडगा काढण्यासारखे काहीच नसल्याने अण्णांनी यावेळी गिरीश महाजन यांच्या भेटीला नकार दिला, अशी माहिती पत्रकारांशी बोलताना अण्णा हजारेंनी दिली आहे. महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी ठरल्यानुसार आपापल्या नियोजित ठिकाणी आंदोलन सुरू करण्याचे आवाहन केले आहे.