गडचिरोलीत नक्षल्यांकडून आणखी एका आदिवासीची हत्या
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :30-Jan-2019
गडचिरोली : 
नक्षलवाद्यांनी आज बुधवारी आणखी एका निरपराध आदिवासी नागरिकाची हत्या केली आहे. ही घटना भामरागड तालुक्यातील पेनगुंडा येथे घडली. या आठवड्यातील नक्षलवाद्यांकडून करण्यात आलेली ही पाचवी हत्या आहे. 

 
या हत्येने परिसरात सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. हा आदिवासी पोलिसांचा खबऱ्या असल्याचा संशय नक्षल्यांचा आल्यामुळे त्याची हत्या  करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.