निवृत्तीनंतरही सचिनची क्रेझ कायम, चाहत्याने दिली ही खास भेट
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :30-Jan-2019
नवी दिल्ली :
भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरने २०११ साली निवृत्ती जाहीर केली. मात्र, आठ वर्षे उलटूनही सचिनची लोकप्रियता कमी झालेली नाही. कारण निवृत्तीनंतर तब्बल आठ वर्षांनीही एका चाहत्याने सचिनला खास भेट दिली आहे. या चाहत्याने सचिनवर खास एक लायब्ररी बनवली आहे. या लायब्ररीमध्ये तब्बल सचिनवरील तब्बल ६० पुस्तकांचा समावेश आहे.
 
 
हे चाहते आहे केरळमधील प्रोफेसर वशिष्ट मणिकोठ, ते मालाबार क्रिश्चियन कॉलेजमध्ये इतिहास हा विषय शिकवतात. वशिष्ट हे सचिनचे फार मोठे चाहते आहेत. सचिनच्या प्रेमापोटी त्यांनी सचिनवरील बऱ्याच गोष्टी जमा केल्या.
 
 
त्यांनी सचिनवरील ६० पुस्तके जमा केल्यावर एक लायब्ररी सुरु केली. या लायब्ररीमधील ६० पुस्तके ११ विविध भाषांमध्ये आहेत. यामध्ये मराठी, हिंदी, तमिळ, तेलगू, मल्यालम, कन्नड, गुजराती अशा विविध भाषांतील पुस्तकांचा समावेश आहे. वशिष्ट यांच्या लायब्ररीची सध्या देशामध्ये चर्चा सुरु आहे. युवा पिढीचा चांगला प्रतिसाद या लायब्ररीला मिळत आहे.

भारत खेळांवर प्रेम करणारा नव्हे, खेळणारा देश व्हावा:सचिन तेंडुलकर
 
‘भारत हा केवळ खेळावर प्रेम करणारा नव्हे तर खेळ खेळणारा देश व्हावा. युवा, तंदुरुस्त आणि सुदृढ भारत घडविण्यासाठी खेळावर प्रेम करणारा ते खेळ खेळणारा देश हे स्थित्यंतर येण्याचे काम प्रत्येक नागरिकांनी करायला हवे,’ असे आवाहन महान  क्रिकेटपटू,‘भारतरत्न’ सचिन तेंडुलकर याने शनिवारी नागपुरात केले होते. आपले हेच स्वप्न असल्याचे सचिनने सांगताच उपस्थित हजारो नागरिकांनी टाळ्यांचा गजर करीत सचिनला जोरदार साथ दिली.
 
 
इतर देशांच्या तुलनेत भारतात आरोग्याचे प्रश्न मोठे असल्याचे सांगून सचिन म्हणाला,‘आम्ही खेळांवर प्रेम तर करतो, पण खेळत नसल्याने आरोग्याच्या समस्यांवर मोठ्या प्रमाणावर खर्च होतो. युवा असणे याचा अर्थ फिट असणे असा नाही. खेळाच्या माध्यमातून आयुष्याला शिस्त लावण्याचे काम प्रत्येकाने केलेच पाहिजे. आम्ही सुदृढ राहू आणि इतरांनादेखील प्रोत्साहन देऊ, हा मंत्र पेरण्यासाठी राजदूत बनायला हवे.