...तर लोकसभा निवडणुकीपूर्वी होतील दंगली; अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा दावा
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :30-Jan-2019

 
 
भारतात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. या निवडणुकीच्या मतदानासाठी काही महिन्यांचाच कालावधी शिल्लक आहे. देशवासीयांप्रमाणेच सार्‍या जगाचेही या निवडणुकीकडे लक्ष लागलेले राहणार आहे. अशात अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने एक खळबळजनक दावा केला आहे. भाजपा लोकसभा निवडणुकीपूर्वी कट्टरतेवर उतरल्यास देशात दंगली घडतील, असा दावा अमेरिकन गुप्तचर यंत्रणा असलेल्या सीआयएने केला आहे.
 
अमेरिकी सिनेटला सोपवण्यात आलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली असल्याची माहिती आहे. भाजपाने निवडणुकीपूर्वी िंहदू राष्ट्राच्या मुद्यावर जोर दिल्यास देशात सांप्रदायिक दंगली भडकतील, असा दावा या अहवालात करण्यात आला आहे. अहवालानुसार, अमेरिकी सिनेटच्या निवड समितीसमोर हा अहवाल ठेवण्यात आला आहे. सीआयए या गुप्तचर विभागाचे संचालक डेन कोट्स यांनी हा अहवाल तयार केला आहे.
 
अहवालात लिहिले आहे की, जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपा िंहदू राष्ट्राच्या मुद्यावर पुढे गेल्यास भारतात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच दंगली होतील. अमेरिका प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला हा अहवाल प्रसिद्ध करते. ज्यात देशभरातील घटनांचे मूल्यांकन केले जाते.
....