उपराजधानी गारठली; तापमान सरासरीपेक्षा १.९ अंशाने घसरले
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :30-Jan-2019
 
 
 
 
 
नागपूर:
 
गेल्या दहा दिवसांपासून उत्तरेकडून येणाऱ्या बोचऱ्या गार वाऱ्याचा व त्याने वाढत जाणाऱ्या थंडीचा कडाका सहन करणाऱ्या नागपूरकरांना अजून एका थंडगार रात्रीचा सामना करावा लागला. बुधवारी सकाळी सूर्याने दर्शन दिले असले तरी हवेतला गारठा कमी झाला नाही . या वाऱ्यांचा जोर वाढल्याने मंगळवारी रात्री नागपूरचे किमान तापमान ४.६ एवढे नोंदविण्यात आले. हे तापमान सरासरीपेक्षा १.९ अंशाने घसरले आहे.
 
हवामानखात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार ३० जानेवारी रोजी नागपुरातील किमान तापमान ५ अंश एवढे राहण्याची शक्यता आहे. तसेच चालू आठवड्यात ते क्रमश: अधिक वाढत जाण्याची शक्यताही सांगण्यात आली आहे.