पॉप सिंगर शिवानी भाटियाचा कार अपघातात मृत्यू
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :30-Jan-2019

 
 
 
 
नवी दिल्ली :
 
सोमवारी आग्रा येथे एका कार्क्रमासाठी जात असतांना यमुना-एक्स्प्रेस हायवेवर एका अपघातात दिल्लीची प्रसिद्ध पॉप गायिका शिवानी भाटिया हिचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत तिचा पती निखिल भाटिया गंभीररित्या जखमी झाला आहे. पोलिसांच्या  माहितीनुसार , पती-पत्नी सोमवारी आग्रा येथे एका कार्यक्रमासाठी जात असताना कार दुर्घटना झाली. सुरीर कोतवाली जवळ हा अपघात झाला. त्यांची कार एका दुसऱ्या गाडीला धडकली. अपघातात कारचा अक्षरशः  चुराडा झाला.
 

मूळची बिहारच्या सीतामढी जनपदची राहणारी शिवानी भाटिया मागील काही वर्षांपासून दिल्लीच्या लाजपतनगर येथे पती निखिल भाटियासोबत राहत होती. पॉप गायिका म्हणून तिने खूप नाव कमवलं होतं. सोमवारी आग्रा येथे तिचा एक शो होणार होता. त्यासाठीच ती निघाली होती. शिवानीचा पती निखिल भाटिया हेच गाडी चालवत होते.