टीव्ही अभिनेता राहुल दीक्षितची आत्महत्या
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :30-Jan-2019
 
 
 
 
 
टीव्हीवरील मालिकांमध्ये काम करणाऱ्या राहुल दीक्षित या स्ट्रगलर अभिनेत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. एएनआयने यासंदर्भात ट्विट केले आहे. पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यू म्हणून नोंद केली आहे. बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.
एएनआयच्या वृत्तानुसार, राहुल दीक्षित असे आत्महत्या केलेल्या २८ वर्षीय अभिनेत्याचे नाव आहे. बुधवारी सकाळी त्याने आत्महत्या केल्याचे उघड झाले. तो टीव्हीवरील विविध मालिकांमध्ये काम करीत होता. त्याने कोणत्या कारणासाठी आत्महत्या केली हे अद्याप कळू शकलेले नाही. पोलीस याचा शोध घेत आहेत.