माझी सर्वात कठीण लढाई : कॅरोलिना मरिन
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :30-Jan-2019
माद्रिद :
ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती स्पेनची स्टार बॅडिंमटनपटू कॅरोलिना मरिन सहा महिने बॅडिंमटन कोर्टपासून दूर राहणार आहे. भारताच्या सायना नेहवालविरुद्ध इंडोनेशिया मास्टर्स स्पर्धेच्या अंतिम सामन्यादरम्यान मारिनच्या पायाला दुखापत झाली होती. त्या सामन्यातून तिने माघार घेतल्यामळे सायनाला विजेती घोषित करण्यात आले. आता कॅरोलिना मरिनच्या उजव्या पायावर शस्त्रक्रिया होणार आहे. त्याकरिता ती रुग्णालयामध्ये भरती झाली आहे.
 
 
 
रुग्णालयात भरती झाल्यानंतर तिने पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला व त्याखाली लिहीले की, 'ही माझी सर्वात कठीण लढाई आहे, परंतु मला आशा आहे की, मी अधिक मजबूत होऊन कोर्टवर परतेल.'
 

 
 
सहा महिने कोर्टपासून दूर राहणार असल्यामुळे ऑगस्ट महिन्यात होणार्‍या विश्व स्पर्धेतसुद्धा तिच्या खेळण्याच्या शक्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्वीत्झर्लंडमध्ये १९ ते २५ ऑगस्टदरम्यान विश्व बॅडिंमटन स्पर्धा होणार आहे. २०१८ मध्ये कॅरोलिना मारिन तीन विश्व स्पर्धा जिंकणारी पहिली महिला खेळाडू ठरली होती.