उबर सुरू करणार बोट सेवा - गेट वे ऑफ इंडिया ते मांडावा
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :30-Jan-2019
मुंबई,
 
 
महानगरांमध्ये कॅब सेवा देणारी उबर लवकरच मुंबईत बोट सेवा सुरू करणार आहे. ही बोट सेवा गेटवे ऑफ इंडियापासून १९ किमी दूर असलेल्या मांडवा जेटीपर्यंत देण्यात येणार असून मुंबईतील सर्वात जलद बोटसेवा असणार आहे.

 
 
गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा जेटी हे अंतर १९ किमी आहे. रस्त्याने हे अंतर कापायला सा़डेतीन तास लागतात. तर जहाजाने गेल्यास तेच अंतर एका तासांत कापलं जातं. उबरचा दावा आहे की नवी उबर बोट हे अंतर फक्त २० मिनिटांत कापेल. या बोटची क्षमता ६-८ प्रवासी असेल. भारतातील ही पहिली उबर बोट सेवा ठरणार आहे.