विश्वविजेता बुद्धिबळपटू व्लादीमिर क्रॅमोनिक निवृत्त
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :30-Jan-2019
मॉस्को :
रशियाचा माजी विश्वविजेता बुद्धिबळपटू व्लादीमिर क्रॅमोनिक याने व्यावसायिक बुद्धिबळातून निवृत्ती स्वीकारली आहे. नेदरलॅण्डमधील विक आन झी येथे झालेल्या टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेनंतर त्याने आपल्या निवृत्तीची घोषणा केली.
 
 
 
जवळपास तीन दशके व्यावसायिक बुद्धिबळात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणार्‍या ग्रॅण्डमास्टर क्रॅमोनिकने २००० साली गॅरी कास्पारोव्हचे साम्राज्य मोडीत काढत पहिल्यांदा जगज्जेता होण्याचा मान पटकावला होता. त्यानंतर सात वर्षे त्याने जगज्जेतेपदाचा किताब आपल्याकडेच कायम राखला.
 
२००७ मध्ये भारताच्या विश्वनाथन आनंदने त्याच्याकडून जगज्जेतेपदाचा किताब हिसकावून घेतला. ४३ वर्षीय क्रॅमोनिकने व्यावसायिक बुद्धिबळातील जवळपास सर्वच प्रतिष्ठेच्या स्पर्धाच्या जेतेपदांवर नाव कोरले आहे.