मोफत टीव्ही चॅनलसाठी मोजावे लागणार प्रतिमहिना १५३ रुपये
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :31-Jan-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
नवी दिल्ली:
 
टीव्ही पाहणाऱ्यांचा पुढील महिन्यापासून खर्च कमी होणार आहे.  टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया(ट्राय)च्या आदेशामुळे आता प्रेक्षकांना १५३ रुपये(जीएसटी सहित) प्रति महिना खर्च करून  १०० चॅनल्स आणि इतर मोफत चॅनल्स पाहता येणार आहे. ट्राय ने ग्राहकांना ३१ जानेवारीपूर्वीच संबंधित १०० चॅनल्स निवडण्यास सांगितले असून, नवी यंत्रणा एक फरवरीपासून  लागू होणार आहे. ग्राहकांना मोबाईलवर एसएमएस पाठवून याची माहिती दिली जातेय. ट्राय ने जारी केलेल्या दोन टेलिफोन नंबर आणि ईमेल आयडीच्या माध्यमातूनही आपल्याला यासंदर्भात माहिती मिळू शकते. ट्राय च्या माहितीनुसार, पॅकमध्ये एचडी चॅनल्सचा समावेश नाही. एका एचडी चॅनलच्या किमतीत  दोन एसडी चॅनल्स मिळतील. 
 
दुसरीकडे ट्राय ने सर्व केबल आणि डीटीएच ऑपरेटर्सना १ फेब्रुवार पासून नवी सिस्टीम लागू करण्याचे आदेश दिले आहे. या मुळे आपल्या आवडीचे चॅनल्सचेच पैसे ग्राहकांना मोजावे लागणार आहे. एका चॅनल्ससाठी १ रुपये  ते जास्तीत जास्त १९ रुपये मोजावे लागणार आहेत. चॅनल्स वेगवेगळ्या स्वरूपातही आपण निवडू शकता. नवी यंत्रणा सुरुवातीला २९ डिसेंबर २०१८ रोजी लागू होणार होती. परंतु ट्राय ने मुदत वाढवून १ फेब्रुवारी २०१९ करण्यात आली आहे.
ग्राहक 011-23237922 (ए.के. भारद्वाज) आणि 011-23220209 (अरविंद कुमार) या नंबरवर कॉल करून किंवा [email protected] या [email protected] या ईमेल आयडीवर मेल करून तुम्ही अधिक माहिती मिळवू शकता.
 
 
ट्रायने चॅनेलची लिस्ट किंमतीसह खाली दिलेल्या वेबसाईट वर दिली आहे .