उपवासाचा उत्तपम
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :31-Jan-2019
आवळा म्हणजे व्हिटॅमिन ‘सी’चे भांडार! याच्या सेवनाने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे त्याचे बाराही महिने सेवन करणे गरजेचे आहे. हिवाळ्यात आवळे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असल्याने याचे पदार्थ बनवून वर्षभर त्याचे सेवन करता येते. आवळ्याचे लोणचे सोडले तर बाकी पदार्थ वर्षभर टिकतात.त्यामुळे बाजारात आवळे उपलब्ध असेपर्यंत तात्पुरते आवळ्याचे लोणचे करता येते. मोरावळा, आवळा सुपारी, किसाचा मुरब्बा आदी पदार्थ तसार करून त्याचा वर्षभर आस्वाद घेता येतो. मोरावळा जेवढा जुना तेवढा तो पौष्टिक असतो. मोरावळ्याकरिता मोठे मोठे आवळे निवडावे. उन्हाळ्यात आपण थकून आलो की एक मोरावळा खाल्ला तरी थकवा नाहिसा होतो.

 
मोरावळा :
प्रथम आवळे स्वच्छ धुऊन पुसून घ्यावेत. एका मोठ्या पातेल्यात गॅसवर पाणी गरम करायला ठेवावे. ते उकळ्याला लागल्यावर त्या भांड्यावर एक मोठी रोळी ठेवून त्यात हे आवळे टोचून ठेवावे. रोळीवर झाकण ठेवून 10 मिनिटे हे आवळे गॅसवर उकळू द्यावे. नंतर गॅस बंद करून 1 मिनिटाने ही रोळी काढून त्यातील आवळे थंड झाल्यावर एका पातेल्यात काढून त्यातील पाणी सुकू द्यावे.
एक पातेले घेऊन त्यात साखर घ्यावी ही घेताना साधारण आवळ्याच्या नेहमी दुप्पट साखर घ्यावी. म्हणजे एक पाव आवळे असेल तर 1/2 किलो साखर पातेल्यात घ्यावी त्यात थोडे पाणी टाकून हे पातेले पाक तयार करण्याकरिता गॅसवर ठेवावे. सतत त्यात चमचा ढवळत राहावा म्हणजे खाली तळाशी साखर लागणार नाही. पाक थोडा घट्टसर होत आला की. त्यात हे सगळे आवळे टाकावे आणि सतत चमचा फिरवत रहावा. 5 मिनिटाने गॅस बंद करून त्या मोरआवळ्यात वलेदोड्याची पूड, थोडे केेशर टाकावे कलर खूप सुंदर येतो. थंड झाल्यावर हा मोरावळा काचेच्या बरणीत भरून ठेवावा. उन्हाळ्यात रोज सकाळी एक मोरावळा खावा, आरोग्याकरिता फारच उपयोगी असा हा मोरआवळा आहे.
...........................................................
उपवासाचा उत्तपम
उपवास पदार्थामध्ये नेहमी नेहमी उसळ, भगर, वडे हेच पदार्थ डोळ्यासमोर दिसतात, तर दुसरे उपवासाचे काय करायचे म्हणून बराच प्रश्न देखील समोर येत असतो अशावेळी बदल म्हणून एखाद्यावेळी उपवासाचा उत्तपम करून त्यासोबत उपवासाची आमटी देखील करावी.

 
उत्तपम कृती : प्रथम एक वाटी भगर स्वच्छ धुऊन घ्यावी. त्यात राजगीरा असेल तर तो निवडून अर्धा वाटी घ्यावा. साबुदाणा अर्ध्यावाटीपेक्षा कमी भिजवून घ्यावा. या सगळ्याचे मिश्रण एकत्र काढावे. आंबट येण्याकरिता त्यात थोडे ताक टाकून 2 तास भिजवून ठेवावे. नंतर भज्यासारखे पातळ करून त्यात थोडे मिठ टाकावे आणि तव्यावर मिठाचे पाणी िंशपडून त्यावर हे उपवासाचे सारण टाकावे. त्यावर गाजर कीस, पनीर कीस, कच्च्या पपईचा कीस, हिरवी बारीक चिरलेली मिरची असे सगळे त्या सारणावर टाकावे व चांगले होऊ द्यावे.
उपवासाची आमटी
आमटीकरिता एक उकडलेला बटाटा, हिरवी मिरची, गाजराचे छोटे छोटे काप, थोडा दाण्याचा कूट, िंशगाड्याचे पीठ.
पहिल्यांदा एका पातेल्यात िंशगाड्याचे छोट्या चमचाभर दोन चमचे पीठ घेऊन त्यात एक बटाटा टाकावा. थोडा दाण्याचा कूट टाकावा हे मिश्रण चांगले फेटून नंतर ते सारण पाणी टाकून पातळ करावे. फोडणीकरिता गॅसवर एका पातेल्यात तेल टाकून जिरे फोडणी करून त्यात हिरवी मिरची सोडावी. थोेडे तिखट घालावे. जिरे पावडर टाकावी गॅस कमी करून हे मिश्रण त्यात सोडावे. त्यानंतर गाजराच्या फोडी टाकाव्यात थोडी उकळी आली की गॅस बंद करावा. आपल्या आवडीनुसार आमटी गोड आंबट हवी असल्यास थोडे िंलबू पिळून चमचाभर साखर टाकावी व गरम गरम उत्तपमसोबत सर्व्ह करावी.
.....................