2019 चे ट्रेंडिंग फॅशन
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :31-Jan-2019
कपड्यांमध्ये नेहमीच आपलायला काहीतरी नवीन पहायला मिळत असून मागच्या वर्षी विविध आऊटफिट त्याच्यामुळे मिळणार्‍या युनिक लूकमुळे प्रसिद्ध झाले. सध्या पॅचवर्क ट्रेंडिंगमध्ये असून पॅचवर्क फुटवेयर सुद्धा बाजारात उपलब्ध आहे. या वर्षीच्या सुरुवातीला मॅरीगोल्ड येल्लो ( पिवळा ) रंगा बद्दल बरेच काही ऐकायला मिळाले. आऊटफिटसह सनग्लासेसमध्ये सुद्धा विविधता पाहायला मिळत असून सध्या हाय पॉईंटेड सनग्लासेस चर्चेत आहे. हे अजब गजब सनग्लासेस त्या मध्ये उपलब्ध असलेल्या रंगामुळे सुद्धा ट्रेंडिंगगमध्ये आहे. तसेच टीम टाय-डाय मध्ये विविध रंगांचे वापर करून एक प्रिंट तयार केले जाते. महिलांमध्ये ओव्हर नि-बूट्स प्रसिद्ध असून या बूटचा वापर हिवाळ्यात केला जातो. सॅटिनचे फ्लोरल प्रिंट असलेले गाऊन पार्टीसाठी उत्तम असून पुरुषांमध्ये दोन वेगळे रंग असलेले ब्लाझेर ट्रेंडिंगमध्ये आहे. अशाच काही विविध आणि हटके फॅशन ट्रेंडबद्दल आज मी तुम्हाला सांगणार आहे.

 
 
मॅरीगोल्ड येल्लो
मागच्या वर्षी अक्वा ग्रीन आणि नियॉन रंगाचे क्रेझ होते. रंगांमध्ये अनेक शेड्स पाहायला मिळत असून यामध्ये अनेक हटके आऊटफिट बाजारात उपलब्ध आहे. सध्या मॅरीगोल्ड येल्लो ट्रेंडिंगमध्ये असून झेंडू फुलाच्या पिवळ्या रंगला मॅरीगोल्ड येल्लो असे म्हणतात. या रंगामध्ये अनेक विविध आऊटफिट्स आणि फुटवेयर्स वर्षाच्या सुरुवातीला पाहायला मिळालीत. मॅरीगोल्ड येल्लो रंगाचे ड्रेस प्रत्येक प्रसंगात शोभून दिसते. तसेच पार्टीसाठी लेस आणि फ्लेर्ड ड्रेस उत्तम असून मॅरीगोल्ड येल्लो रंगाचे ड्रेस रात्रीच्या वेळी ब्राईट लूक देतात. आऊटफिटसह फुटवेयर्समध्ये सुद्धा हे रंग उपलब्ध आहे. पांढर्‍या रंगाच्या आऊटफिटवर या रंगाचे स्टिलेटोस किंवा स्नीकर्स हटके लूक देईल. तसेच मॅरीगोल्ड येल्लो रंगाचे प्रिंटेड शर्ट सुद्धा बाजारात उपलब्ध आहे. फंकी लूकसाठी हे शर्ट नक्की परिधान करावे. पारंपरिक वेषभूषेमध्ये सुद्धा या रंगाचे कपडे उपलब्ध असून पुरुषांमध्ये फ्लोरल प्रिंटचे शेरवानी आणि महिलांमध्ये लॉन्ग लेन्थ अनारकली प्रसिद्ध आहे. साड्यांमध्ये सुद्धा या रंगाचे विविध पर्याय उपलब्ध आहे. ऍक्सेसरीजमध्ये स्कार्फ आणि क्लच सध्या ट्रेिंडगमध्ये आहे.

 
 
पॅचवर्क
विविध रंगांचे कापड एकत्र जोडून तयार केलेल्या आऊटफिटला पॅचवर्क असे म्हणतात. महिलांसह पुरुषांमध्ये सुद्धा पॅचवर्क प्रसिद्ध असून या प्रिंटचे आऊटफिट हटके आणि स्टाईलिश लूकमुळे प्रसिद्ध झाले. महिलांसाठी पॅचवर्क असलेले गाऊन पार्टीसाठी उत्तम आहे. तसेच पॅचवर्क असलेली पॅन्ट बाजारात उपलब्ध असून हे पॅन्ट कॅज्युअल आऊटफिट म्हणून परिधान करणे टाळावे. पॅचवर्कमध्ये भडक रंगाचे वापर केले जात असून हे आऊटफिट रात्रीच्या वेळी ब्राईट लूक देतात. साडी आणि शेरवानी सारख्या पारंपरिक वेषभूषेवर सुद्धा पॅचवर्क पाहायला मिळते. कपड्यांसह फुटवेयर्समध्ये सुद्धा पॅचवर्क बाजारात उपलब्ध असून नि-लेन्थ बूट्स या मध्ये प्रसिद्ध आहे. तसेच पुरुषांसाठी पॅचवर्क असलेले ब्लेझर पार्टी लूकसाठी उत्तम आहे. पॅचवर्क असलेले टाय आणि स्नीकर्स हटके लूक देते. हे वर्क असलेल्या ब्लेझर खाली फिक्कट रंगाचे फॉर्मल शर्ट शोभून दिसते. पॅचवर्क असलेले स्कार्फ कुर्ती किंवा ट्युनिकला हटके आणि स्टाईलिश लूक देते.
 
 

 
हाय पॉईंटेड ट्रायंगल सनग्लासेस
ट्रेंडी फॅशनसह काही अजब-गजब फॅशनसुद्धा या वर्षाच्या सुरुवातीला पहायला मिळाली. सनग्लासेसमध्ये विविध फ्रेम्स बाजारात उपलब्ध असून सध्या हाय पॉईंटेड ट्रायंगल त्याच्या युनिक लूकमुळे चर्चेत आहे. हे अजब-गजब सनग्लासेस बारीक असून या मध्ये अनेक रंग उपलब्ध आहे. सध्या लाल आणि जांभळा रंग या सनग्लासेसमध्ये प्रसिद्ध आहे.
 
- सृष्टी परचाके