जिंद विधानसभा क्षेत्रात पहिल्यांदाच फुलले कमळ
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :31-Jan-2019
- भाजपाचे कृष्णलाल मिश्रा 12 हजार 935 मतांनी विजयी
-काँग्रेसचे रणदीप सुरजेवाला 22 हजार 740 मतांसह तिसऱ्या स्थानावर
 
जिंद ( हरयाणा) : सत्ताधारी भाजपा आणि विरोधी पक्ष काँग्रेसने प्रतिष्ठेच्या केलेल्या जिंद विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपाने काँग्रेसला धक्का दिला आहे.
 

 
 
जिंद विधानसभा मतदासंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपाचे कृष्णलाल मिश्रा यांनी १२ हजार ९३५ मतांनी विजय मिळवला आहे. कृष्णलाल मिढ्डा यांना ५० हजार ५६६ मते मिळाली. तर, जननायक जनता पार्टीचे दिग्विजयसिंह चौटाला ३७ हजार ६३१ मतांसह दुसऱ्या स्थानावर राहिले. काँग्रेसचे रणदीप सुरजेवाला यांना २२ हजार ७४० मतांसह तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
 
 
जिंद विधानसभेच्या निवडणूकित भाजपाने हरिचंद मिढ्ढा यांचे पुत्र कृष्णलाल मिढ्ढा यांना उमेदवारी दिल्ली होती. तर काँग्रेसने राज्यातील दिग्गज नेते रणदीप सुरजेवाला यांना मैदानात उतरवले होते. तर नव्याने उदयास आलेल्या जननायक जनता पार्टीने दिग्विजय सिंह चौटाला उमेदवारी दिली होती.
 
 
विशेष बाब म्हणजे या मतदारसंघात आतापर्यंत कधीही भाजपाला विजय मिळवला आला नव्हता. अखेर आज भाजपाने या मतदारसंघात भाजपाने आपले खाते उघडले. दरम्यान, विजयानंतर कृष्णलाल मिढ्ढा म्हणाले की, '' ज्यांनी मला आणि माझ्या पक्षाला पाठिंबा दिला त्यांचे मी आभार मानतो.''
 
 
तर काँग्रेस उमेदवार रणदीप सुरजेवाला यांनी आपल्या पराभव मान्य केला आहे. आता मनोहरलाल खट्टर आणि कृष्णलाल मिढ्ढा हे जिंद येथील नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करतील, असे सुरजेवाला म्हणाले.