चौथ्या वन-डेत भारताचा पराभव
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :31-Jan-2019
हॅमिल्टन :
हॅमिल्टनमधील चौथ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने भारतीय संघावर आठ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात भारताने विजयासाठी दिलेले ९३ धावांचे आव्हान न्यूझीलंडने सहज पार केले. हेन्री निकोल्स आणि रॉस टेलर यांच्या अर्धशतकी भागीदारीने न्यूझीलंडने भारताचे आव्हान केवळ १४.२ षटकांत गाठले.
 
 
नाणेफेक जिंकत न्यूझीलंडने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारतातर्फे मैदानावर उतरलेला रोहित शर्माला अवघ्या ७ धावातच तंबूत परतावे लागले. यानंतर शिखर धवन १३, शुभमन गिल ९, हार्दिक पंड्या १६, कुलदीप यादव १५, युजवेंद्र चहल १८ धावांवर बाद झाले. भारताचा डाव अवघ्या ३०.५ षटकांत ९२ धावातच आटोपला. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचेही दोन फलंदाज लवकर माघारी परतले. परंतु, हेन्री निकोल्स (३०) आणि रॉस टेलर (३७) यांनी न्यूझीलंडला विजय मिळवून दिला.
दरम्यान, भारतीय संघाने तीन सामने जिंकून न्यूझीलंडमधील पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका आधीच खिशात घातली आहे.