चंद्राच्या पृष्ठभागाचे तापमान उणे 190 डिग्री
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :31-Jan-2019
- चीनच्या ‘चेंग-४ प्रोब’ यानाचे निरीक्षण
 
बीजिंग :
चीनच्या चेंग-४ प्रोब या यानाने चंद्राच्या पृथ्वीवरुन न दिसणार्‍या भागावर तापमान उणे १९० डिग्री असल्याचे नोंदविले आहे. त्यामुळे चंद्राचा पृष्ठभाग अपेक्षेपेक्षा थंड आहे.
 
चंद्राच्या पृष्ठभागावरील रात्रीच्या तापमानाबाबत चीनी शास्त्रज्ञांना प्रथमच ठोस माहिती प्राप्त झाली आहे. चेंग ४ प्रोब या यानाने फार काळ स्लीप मोडमध्ये राहल्यानंतर आज चंद्रावरील अतिथंड रात्रीचे तापमान अचूक नोंद्रवल्याचे चीनच्या अवकाश संशोधन संस्थेने आज गुरुवारी जाहीर केले.
 
 
 
चंद्राचे रोटेशन आणि रिव्होल्युशन चक्र एकसारखे फिरत असल्यामुळे पृथ्वीवरुन चंद्राचा नेहमी एकच भाग दिसत असतो. त्यामुळे पृथ्वीवरुन न दिसणार्‍या भागाचे तापमान दिसणार्‍या भागापेक्षा कमी असल्याचे चेंग ४ प्रोब यानाने नोंदविले असल्याचे, चीनच्या ॲकेडमी ऑफ स्पेस टेक्नॉलॉजीमधील चेंग ४ प्रोब प्रोजेक्टचे कार्यकारी संचालक झांग ही यांनी सांगितले.
 
चंद्रावर दिवसा आणि रात्रीदरम्यान तापमान वेगवेगळे असते. पूर्वी, चिनी शास्त्रज्ञांकडे याबाबत कोणताही डेटा उपलब्ध नसल्यामुळे याची नेमकी माहिती नव्हती.