अमेरिकेत कडाक्याची थंडी; तापमान उणे २० सेल्सियस खाली
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :31-Jan-2019
 
 
 
 
 वॉशिंग्टन:
 
 
थंडीचा त्रास नुसते भारतात होत नसून अमेरिकेतील १० राज्यातील परिस्थिती सुद्धा वाइट आहे. अनेक राज्यांमध्ये नद्या पूर्णपणे बर्फ झाले आहे. देशात सरासरी तापमान शून्यापेक्षा कमी झाले आहे.  अमेरिकेत तापमान उणे २० अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाले आहे. येत्या काही तासांत रक्त गोठवणारी उणे ७० अंश सेल्सिअस थंडी पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. बाहेर फिरणाऱ्या लोकांना तसेच प्रामुख्याने बेघर लोकांना वाचविण्यासाठी पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापन दल पेट्रोलिंग करत आहेत. सोबतच, नागरिकांना काम आवश्यक नसेल तर घरीच राहण्याच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
 
 
 
 
 

 
 
 
 
अमेरिकेतील इलिनॉय, आयोवा, मिनिसोटा, नॉर्थ डॅकोटा, साउथ डकोटा, विसकोन्सिन, कन्सास, मिसोरी आणि मोन्टाना येथे सर्वात जास्त थंडी आहे. यापैकी ६ राज्यांमध्ये पोस्टल सेवा तात्पुरत्या बंद करण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय हवामान विभागाने केलेल्या ट्वीटनुसार, "परिस्थिती अतिशय बिकट बनली आहे. आपण बाहेर असाल तर पूर्ण शरीर झाकेल इतके गरम कपडे घालण्याचा सल्ला देण्यात आले आहे.  येत्या काही तासांत तापमान -७० डिग्री सेल्सिअस पर्यंत घसरू शकते . त्यामुळे, नागरिकांनी घरातच राहावे .''
 
 
 


 
 
 पोलिस अधिकाऱ्याने केलेल्या ट्वीटनुसार, "मोकळ्या ठिकाणी थंडीमुळे दृश्यता खूपच कमी झाली आहे. दिवसा प्रवास करत असाल तरीही कारचे हेडलाइट ऑन ठेवावे . सुरक्षेचा उपाय म्हणून हेच चांगले राहील." तर दुसरीकडे, खराब हवामानामुळे अमेरिकेत २७०० फ्लाइट रद्द करण्यात आल्या आहेत. यापैकी १५०० विमान तर एकट्या शिकागो प्रांतात उतरणार होते. शिकागोतील परिस्थिती देशात सर्वात वाइट आहे. या ठिकाणी कमाल तापमान -२७ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे.