चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा पराभव: ट्रेंट बोल्ट ने घेतले सर्वात जलद १०० विक्ट्सचा
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :31-Jan-2019
 
 
 
 
 
 
 
हॅमिल्टन :
 
विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनीच्या अनुपस्थितीत  चौथ्या वन डे सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताचा संपूर्ण संघ ३०.५ ओव्हरमध्ये ९२ धावांवर गारद झाला असून किवी संघाने हे लक्ष्य २ विकेट गमावत १५ ओव्हरमध्येच गाठले. पाच सामन्यांची मालिका भारताने आधीच जिंकली असली तरी या मोठ्या विजयाने किवी संघाचा आत्मविश्वास नक्कीच वाढला असेल. 
 
 
 
 

 
 
 
 
 
गोलंदाज ट्रेंट बोल्टसमोर भारतीय फलंदाज अपयशी ठरले. तसेच सात फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. दोन फलंदाज शून्यावर बाद झाले असून इतर खेळाडूंना सुद्धा जास्त धाव काढता आले नाही.  सर्वाधिक १८ धाव युजवेंद्र चहलने केले. ट्रेंट बोल्टने भारताचे ५ फलंदाज बाद केले. त्याने करिअरमद्ये पाचव्यांदा पाच विकेट घेतल्या आहे. टीम इंडिया ७व्यांदा १०० च्या आत सर्वबाद झाले. न्यूझीलंडविरोधातील हा दुसरा नीचांकी धावसंख्या आहे. यापूर्वी १० ऑगस्ट २०१० ला दांबुलामध्ये भारतीय संघ न्यूझीलंडविरोधात २९.३ ओव्हरमध्ये ८८ धावांवर बाद झाला होता.
किवी संघाच्या दोन्ही विकेट भुवनेश्वर कुमारने घेतल्या. गुप्टीलला १४ तर विल्यमसनला त्याने ११ धावांवर बाद केले. टेलरने नाबाद ३७ तर निकोलसने नाबाद ३० धाव काढले.