भारतीय अभिनेत्याला रशियाच्या विमानतळावर घेतले ताब्यात
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :31-Jan-2019

 

 
 
 
 
मॉस्को :
 
हिंदी मालिकाचा प्रसिद्ध अभिनेता करणवीर बोहरा याला मॉस्को विमानतळावर ताब्यात घेण्यात आले आहे.  पासपोर्ट फाटले  असल्याने त्याला  विमानतळावर सुरक्षारक्षकांनी  ताब्यात घेतले. पासपोर्ट नसल्याने करणवीरला आपला दौरा आटोपता घ्यावा लागणार होता. यामुळे  त्याला मॉस्को विमानतळावरुन परत भारतात पाठविण्यात आले असते. मात्र, तात्काळ तात्पुरता नवा कोरा पासपोर्ट मिळाल्याने त्याच्यावर येणारे संकट टळले. तात्पुरता पासपोर्ट मिळाल्याने करणवीरने परराष्ट्र मंत्री सुष्मा स्वराज  आणि भारताचे आभार व्यक्त करणारा ट्विट देखील करणवीरने केला.
 
 
 
 
 
 
 

करणवीर बोहरा याला मॉस्को विमानतळावर पाच तासापासून बसून ठेवण्यात आले होते. माझे पासपोर्ट फाटले असल्याने मला विमानतळावरील सुरक्षारक्षकांनी ताब्यात घेतले असल्याचे ट्विट करणवीर याने केले.

‘आज एक धक्का बसला. माझा पासपोर्ट फाटलेला असल्याने मला मॉस्को विमानतळावर सिक्युरिटी चेकच्या वेळी बाजुला घेण्यात आले. ते मला भारतात परत पाठविण्याचा प्रयत्न करत आहेत. मॉस्को, रशियातील भारतीय दूतावासाने मला व्हिसा देण्यापूर्वी याविषयी कल्पना द्यायला हवी होती’ असे ट्विट करणवीरने केले. छोट्या पडद्यावरील अनेक कलाकारांनी भारतीय दूतावासाला ट्विट करून करणवीरची समस्या दूर करण्याची विंनती केली.