एक रात्र कवितेची या कार्यक्रमाचे हिंगणघाट येथे रविवारी आयोजन - नामवंत कवींची रंगणार काव्य मैफल
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :31-Jan-2019
हिंगणघाट,
लोकसाहित्य परिषद हिंगणघाट च्या वतीने रविवार दि. 3 फेब्रुवारीला रसिकांच्या मनात घर केलेल्या व विनोदाने शिगोर असा प्रबोधनात्मक 'एक रात्र कवितेची' या काव्य मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे.
 
 
मागील अठ्ठावीस वर्षापासून लोकसाहित्य परिषद या कार्यक्रमाचे आयोजन करीत असून महाराष्ट्रातील नामवंत कवींनी यात सहभाग घेतला आहे.
 
 
 
 
स्थानिक हरिओम मंगल कार्यालयात सायंकाळी 6 वाजता होणाऱ्या या मैफली मध्ये प्रसिध्द विनोदी कवी व चित्रपट निर्माते नारायण सुमंत पूणे, प्रसिद्ध वऱ्हाडी कवी व गजलकार, आबेद शेख पुसद, संवेदनशील कवी गोपाल मापारी बुलढाणा, वऱ्हाडी कथाकार, कवी पुरुषोत्तम गावंडे वणी हे मान्यवर कवी सहभागी होणार आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला समाजसेवक डॉ नंदकुमार पालवे चिखली जिल्हा बुलढाणा याना 'विदर्भ लोक रत्न' हा सन्मान तर लोकसाहित्य गौरव सन्मान बिऱ्हाडकर अशोक पवार चंद्रपूर यांना झाडीबोली साहित्य मंडळ वरोरा चे अध्यक्ष ना गो थुटे, व डॉ रवींद्र ठाकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी आमदार समीर कुणावार, माजी सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे,नगराध्यक्ष प्रेम बसंतांनी, प्रा डॉ उषाताई थुटे, चारुशीला टोकस, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष सुधीर कोठारी यांची उपस्थिती राहणार आहे.
 
 
सायंकाळी 6 वाजता सुरु होणाऱ्या या काव्य मैफलीला रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन लोकसाहित्य परिषदेने केले आहे.