ठाण्यातील व्हिवियाना मॉलजवळ बॉलिवूडची अभिनेत्री शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टीच्या गाडीला अपघात झाले असून तीन अज्ञात व्यक्तींनी शमिताच्या गाडीला मोटारसायकलने धडक दिल्याची माहिती मिळाली आहे. अपघातातून शमिता बचावली असून तिच्या ड्रायव्हरला मारहाण करण्यात आले आहे. याप्रकरणी शमिताने राबोडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. शमिताच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दखल घेत तीन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याप्रमाणेच पुढील तपास सुरु झाला आहे.
शमिताने ‘मोहब्बते’ सारख्या सुपरहिट चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले असून ‘खतरों के खिलाडी’च्या ९ व्या पर्वातही तिने सहभाग घेतले होते.