अकोल्यात भाजपाच्या चारही विद्यमान आमदारांना उमेदवारी

    दिनांक :01-Oct-2019
अकोला,
भाजपाने उमेदवारांची पहिली यादी घोषित केली आहे. यात अकोल्यातील चारही विद्यमान आमदारांच्या उमेदवारी घोषणा करण्यात आली आहे. जिल्ह्यातील अकोला पूर्व, अकोला पश्चिम, अकोट व मूर्तिजापूर या मतदारसंघामध्ये अनुक्रमे रणधीर सावरकर, गोवर्धन शर्मा, प्रकाश भारसाकळे व हरिष पिंपळे यांच्या उमेदवारीची घोषणा आली.
 

 
 
अकोला पश्चिम मतदारसंघात गोवर्धन शर्मा हे सलग पाचवेळा निवडुन आले असून, यावेळी त्यांना सहाव्यांदा संधी देण्यात आली आहे. अकोला पूर्व मतदारसंघात २०१४ मध्ये पहिल्यांदा निवडूण आलेल्या रणधीर सावरकर यांना यावेळी दुसरी संधी मिळाली आहे. अकोट मतदारसंघात प्रकाश भारसाकळे यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर मूर्तिजापूर मतदारसंघात आमदार हरीश पिंपळे यांची उमेदवारी कायम ठेवण्यात आली असून त्यांना ही तिसरी संधी आहे