अमरावती विद्यापीठाचा युवा महोत्सव

    दिनांक :01-Oct-2019
विद्यार्थांकडून दर्जेदार कलाविष्काराचे सादरीकरण
अमरावती,
विद्यापीठाच्यावतीने शासकीय विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्था, अमरावती परिसरात सुरु असलेला युवा महोत्सव -2019 कार्यक्रमामध्ये सोमवार पहिल्या व मंगळवार दुसर्‍या दिवशी सहभागी महाविद्यालयातील विद्यार्थी कलावंतांनी विविध कला प्रकारात दर्जेदार सादरीकरण करुन उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
 
 
 
पहिल्या व दुसर्‍या दिवशी गोंडी, गोंधळ, राजस्थानी, दिंडी, लावणी, गुजराती लोकनृत्य, भारतीय समुहगान, एकांकीका, स्किट व माईम, वादविवाद, वक्तृत्व स्पर्धा, कोलाज, पाश्चिमात्य वाद्यसंगीत, स्थळ छायाचित्रिकरण यासह शास्त्रीय नृत्य, लोकनृत्य, सुगम संगीत, स्पॉट पेंटींग व पोस्टर मेकिंग, पाश्चिमात्य गायन व पाश्चिमात्य समूहगान, क्विज लेखी परीक्षा आदी विविध कला व स्पर्धा प्रकारात कलावंत विद्यार्थांचा सहभाग दर्जेदार राहीला. डॉ. चंदु पाखरे, विद्या साळवे, अक्षरा नाईक (मुंबई) या परिक्षकांसह इतर परिक्षकांनी या स्पर्धांचे काटेकोरपणे परिक्षण केले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. प्रफुल गवई, विद्यार्थी विकास समितीचे सदस्य डॉ. राजीव बोरकर, डॉ. जयश्री वैष्णव, डॉ. रेखा मग्गीरवार, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. दिनेश सातंगे, शासकीय विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. वसंत हेलावी रेड्डी, युवा महोत्सव समन्वयक डॉ. सुधीर मोहोड, सहसमन्वयक डॉ. विनोद गावंडे, महाविद्यालयातील शिक्षक, कर्मचारी, विद्यापीठ विकास विभागातील संतोष वानखडे आदी परिश्रम घेत आहेत. बुधवार 2 ऑक्टोबर रोजी विविध स्पर्धा व कला प्रकारात विद्यार्थी सादरीकरण करतील. तसेच काही स्पर्धंची अंतीम फेरी सुद्धा होईल.