विजेच्या धक्याने महिलेचा मृत्यु

    दिनांक :01-Oct-2019
 
 
समुद्रपूर,
तालुक्यातील वायगांव (गोंड ) येथील ६५ वर्षीय महिला वच्‍छलाबाई रामभाऊ चौधरी सकाळी घरकामे करत असतांना त्यांचा  विजेच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना सोमवार घडली आली
वच्छला घरकामे करत असतांना दरवाज्यावर पडलेला उंदराने अर्धवट कुरतडलेला वायर हाताने दूर करतांना वच्छला चौधरी यांना याना विजेचा तीव्र धक्का लागला. घटना समजता नातेवाईकांनी सदर महिलेला सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात उपचाराकरिता हलविण्यात आले .मात्र रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. वच्‍छलाबाई यांच्या मागे दोन मुले ,एक मुलगी, सुना, नातवंड मोठा आप्तपरिवार आहे. सदर घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.