दुर्गा विसर्जनावेळी दोघे बुडाले

    दिनांक :10-Oct-2019
एकाला वाचविण्यात यश एक बेपत्ता
वर्धा,
हिंगणघाट तालुक्यातील दुर्गा देवी विसर्जनासाठी गेलेले दोन युवक पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली आहे. या दोघातील १ युवक अद्याप बेपत्ता असून एकाला नदीतून बाहेर काढण्यात यश आले आहे. ही घटना बुधवार ९ रोजी सायंकाळी ५ वाजता विसर्जनादरम्यान नदी पत्रातील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने घटना घडली. प्रमोद कोरडे असे बेपत्ता तरुणाचे नाव आहे. तर किशोर शंकर भुडे असे रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या तरुणाचे नाव आहे. 

 
 
किशोर भुडे आणि प्रमोद अशोक कोरडे हे २ तरुण गावातील इतर नागरिकांबरोबर दुर्गा विसर्जनासाठी शेडगाव येथील वणा नदीवर गेले होते. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास नदी पात्रात दुर्गा विसर्जन करताना पाण्याचा अंदाज न आल्याने प्रमोद पाण्याच्या प्रवाहात वाहुन गेला. दरम्यान, किशोरच्या नजरेस पडता त्याने प्रमोदला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रमोदला वाचवण्याच्या प्रयत्नात तो ही पाण्यात बुडाला. एवढ्यात भोई समाजातील एका युवकाच्या लक्षात आल्याने त्याने त्या किशोरला पाण्याबाहेर काढले मात्र, प्रमोद वाहत गेला. सध्या, किशोरवर समुद्रपुरच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार सुरू असुन प्रशासनाकडून बेपत्ता प्रमोदचा शोध घेण्याचे कार्य सुरू आहे.