माणूस म्हणजे सुखदुःखाचे समीकरण

    दिनांक :10-Oct-2019
मुकेश जुनघरे
 
सुख म्हणजे काय सांगायचे झाले तर आपण लहान मुलाला खाऊ खाण्यासाठी काही पैसे दिले त्यावर तो खूप आनंदी होतो, हे सुख आहे. तर आपण लहान मुलाला अभ्यास न केल्यामुळे मारले की तो रडतो ते म्हणजे दुःख. चढ-उतार हे माणसाच्या आयुष्यात फार येतात आणि या चढ-उतारांमुळे तो पुढे जातो. यावरून त्याला सुख वा दुःख झेलण्याची ताकद मिळते आणि तो या छोट्या छोट्या गोष्टींवरून दुःखाचा सामना करण्यास तयार होतो. तुम्ही जर बघितले तर माणसात विविधता आढळून येते म्हणजेच बोलण्याची पद्धत, वागणूक, कपडे, तसेच विचार करण्याची क्षमता. पण बाकी प्राणीमात्रात ती आढळून येत नाही, म्हणजेच पक्ष्यांमध्ये घ्यायचे झाले तर चिऊताईचे उदाहरण घेऊया, चिऊताई स्वतःचे घरटे स्वतः बनवते पण आपण हा कधी विचार केला आहे का? तीन ऋतूत म्हणजेच उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा ती कशी सोसते? 
 
 
उन्हापासून चिऊताई स्वतःचे आणि बाळाचे रक्षण कशी करत असणार? पावसामुळे तिचे घरटे वाहून गेले तर? हिवाळ्यात कडाक्याच्या थंडीपासून त्यांना कोण वाचविणार? असे प्रश्न माणसाला कधीही येऊ शकत नाही आणि जरी आले तरी माणूस काहीही करू शकणार नाही. चिऊताई सारखे कष्ट करण्याची प्रवृत्ती माणसात नाही, कारण माणूस हा स्वतःचे घर स्वतःच्या हाताने बनवत नाही तो त्याचे पैसे मोजतोय्‌ एवढेच, माणूस स्वतःचे दाणे दूरून आणतो हेही नाही कारण आता जागोजागी किराणा दुकान आहेत, हो माणूस त्यासाठी पण पैसे मोजतो. तो तीन ऋतू पासून स्वतःचा बचाव करतो, उन्हामध्ये घरी एसी लावून, पावसाळ्यात तर घर आहेच आणि हिवाण्यासाठी पण माणूस आपल्या स्वतःसाठी जाड कपडे घेऊ शकतो, त्यामुळे तुम्ही स्वतःविचार करा की, माणसाकडे जास्त दुःख आहे वा प्राणी पक्षींकडे...