खोट बोला पण रेटून बोला अशी ही काँग्रेस - राकॉ आघाडी: देवेंद्र फडणवीस

    दिनांक :12-Oct-2019
वाशीम, 
या विधानसभा निवडणुकीत मजा नाही. प्रतिस्पर्धी नसल्याने लढायच कोणाशी हेच समजत नाही. वाशीमचे उमेदवार लखन मलिक व कारंजाचे उमेदवार राजेंद्र पाटणी आखाड्यात उभे आहेत. काँग्रेस पक्षाची अवस्था तर फार बिकट झाली आहे. या निवडणुकीत प्रचार करुनही काहीच फायदा नाही. आपले उमेदवार निववडुन येणार नाहीत. हे माहीत असल्यामुळे राहुल गांधी बँकाकला फिरायला निघुन गेले. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची अवस्था तर फारच बिकट झाली आहे. त्यामुळे 5 वर्षाच्या लहान मुलास जरी विचारले तर तो सांगाते की, राज्यात महायुतीचे सरकार येणार आहे. निकालाची उत्सुकता फक्त एवढीच आहे की, महायुतीचा आकडा 230 की, 240 वर जातो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज, 12 ऑक्टोबर रोजी वाशीम येथे केले.
 
 
 
 
देवेंद्र फडणवीस वाशीम विधानसभा मतदार संघाचे उमेदवार लखन मलिक यांच्या प्रचार सभेत सभेला संबोधीत करित होते. यावेळी व्यासपीठावर उमेदवार लखन मलिक, राजेंद्र पाटणी, माजी आ. विजयराव जाधव, पुरुषोत्तम राजगुरु, सुरेश लुंगे, नगराध्यक्ष अशोक हेडा, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष राजू पाटील राजे, नगराध्यक्ष अशोक हेडा, पुरुषोत्तम चितलांगे, अनिल राठोड, बंडु पाटील महाले, धनंजय हेंद्रे आदी उपस्थित होते.
 
देवेंद्र फडणवीस पूढे म्हणाले की, काँग्रेस व राकाँने आधीच हार स्विकारली आहे. आपल्याला जनता निवडुन देणारच नाही. त्यामुळे त्यांनी दोन दिवसापूर्वी दिलेल्या जाहीरनाम्यात भलतीच आश्‍वासने दिली आहेत. खोट बोला पण रेटुन बोला अशी ही आघाडी. पुढील 15 वर्षातही त्यांचे सरकार येण्याची सुताराम शक्यता नाही. त्यांनी 15 वर्ष सत्ता उपभोगली परंतु हिशोब देवू शकत नाही. काँग्रेस, राकॉला माझे आव्हान आहे. त्यांनी 15 वर्षात काय केले व माझ्या 5 वर्षाच्या कार्यकाळात आम्ही काय केले हे सांगतो. त्यांच्यापेक्षा दुप्पट विकासकामे झाली नसेल तर मत मागायला कोणाच्याही दारावर जाणार नाही, असेही ते यावेळी म्हणाले.
 
मागील 5 वर्षात दीन, दलीत, आदीवासी, महिला, मराठा समाज, धनगर समाज, शेतकरी, कष्टकरी यांच्या पाठीशी उभे राहिले. विदर्भातील शेतकरी अडचणीत असतांना त्याच्या पाठीशी भक्कमपणे त्यांना मदत केली. राज्यात शेतकर्‍यांना सर्वात मोठी कर्जमाफी दिली. शेतकर्‍यांना दुष्काळी व अतिवृष्टीची मदत, पंप, विहिरी, थ्रेशर व ट्रॅक्टर दिले. मागील 5 वर्षात शेतकर्‍यांना दिलेल्या मदतीची जर तुलना केली तर आम्ही 50 हजार कोटी रुपयाची मदत केली आहे. त्यांच्या काळात होती फक्त20 हजार कोटी रुपये. शेतकर्‍यांना फक्त मदत करुनच चालणार नाही तर तो आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहीजे. त्यासाठी वाशीम जिल्ह्यात 585 कोटी रुपयाचे 18 प्रकल्प दिले. त्यामुळे मागील 5 वर्षात 20 हजार हेक्टर सिंचनाची सोय झाली. मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत 30 हजार किमी चे रस्ते पुर्ण झाले असून, वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे 100 कोटी रुपयाचा निधी तर लोणी येथील सखाराम महाराज संस्थानला 10 कोटी रुपयाचा निधी मंजूर करुन कामास सुरूवात झाली आहे. 2021 पर्यंत वाशीम जिल्ह्यात एकही व्यक्ती बेघर राहणार नाही. सर्व अतिक्रमणधारकांना नियमित पट्टा दिला असून, 10 लाख लोकांना मालक बनविले आहे. यापूर्वी फक्त तीन लाख परिवार बचत गटाशी जुळले होते. मात्र, मागील पाच वर्षात दहा लाख परिरवार बचत गटाशी जुळले असून, त्यांना सर्व सोयी व बाजारपेठ उपलब्ध करुन दिली.
यावेळी आ. राजेंद्र पाटणी, माजी आ. विजयराव जाधव यांनी राज्य सरकारने केलेल्या विकासकामाची माहीती देत वाशीम मतदार संघाचे उमेदवार लखन मलिक यांना विजयी करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. दिलीप जोशी यांनी केले.