तुफान पावसात भाजपा उमेदवार अंबरीश राव यांची प्रचार सभा

    दिनांक :12-Oct-2019
अहेरी,  
अहेरी विधानसभा क्षेत्रात निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात आज एटापल्ली येथील समूह निवासी शाळेच्या पटांगणावर अहेरी विधानसभा क्षेत्रासाठी भाजपा, सेना महायुती चे उमेदवार राजे अंबरीश राव आत्राम यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली होती. एटापल्लीत सभा सुरू असताना आलेल्या मूलसधार पावसाने एन्ट्री मारली त्यामुळे सभा बारगळनायची चिन्हे दिसू लागली मात्र एवढया मुसळधार पावसातही जनता सभामंडपात उमेदवार व उपस्थित  मान्यवरांना ऐकण्यासाठी रेटून होती.
 
एकीकडे धुवांधार पाऊस तर दुसरीकडे भाजपा उमेदवार अंबरीश राव यांनी तुफान बॅटिंग करत जनतेला खिळवून ठेवले.
यावेळी झालेल्या सभेला गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अशोक नेते, जिल्हा महामंत्री रवी ओलालवार,जीप सभापती माधुरी उरेते,प्रकाश गेडाम,शिवसेना तालुका प्रमुख किसन मत्तामी,डेडुजी राऊत,अशोक पुल्लूरवार,पंस सदस्य जनार्धन नल्लावार,बाबूंराव गंपावार,विनोद आकंपल्लीवार,दीपक फुलसंगे आदींची उपस्थिती होती.

यावेळी बोलतांना खा.नेते म्हणाले,केंद्रात व राज्यात भाजपा चे सरकार आहे.दोन्ही सरकारने अनेक जणोपयोगी योजना आणलेल्या आहेत.माझाय कार्यकाळात मोठा विकास निधी खेचून आणला आहे.जिल्हात 12246 कोटीचे महामार्ग मंजूर आहेत.वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. राजे अंबरीश यांनी अहेरी क्षेत्रासाठी 2000 कोटींचा मोठा विकासनिधी खेचून आणला आहे. अनेक मोठे कामे त्यांनी केले आहेत भ्रष्टाचार मुक्त ,निष्कलंक असे राजेचे व्यक्तिमत्व आहेत त्यामुळे त्यांना पुन्हा विधानसभेवर पाठवा असे आवाहन त्यांनी उपस्थित जनसमुदायाला केले.
यावेळी बोलताना राजे अंब्रीशराव म्हणाले, मी निस्वार्थ भावनेने केवळ क्षेत्राच्या विकासासाठी आतापर्यंत काम केलेले आहे. आणि हेच ध्येय ठेऊन इथून पुढेही अधिक जोमाने करणार आहे. अधिक जोमाने यासाठी कारण काही गोष्टी मी नवीन असल्यामुळे कळायला उशीर लागला. तेव्हा झालेल्या चुकांमध्ये सुधार करून आतापर्यंत जेवढ्या मोठ्या प्रमाणात विकासाची कामे क्षेत्रातील जनतेच्या उद्धारासाठी घेऊन आलो त्यापेक्षाही अधिक आणि जलदगतीने मतदार संघातील जनतेच्या विकासाची कामे मार्गी लावणार. आपण सर्व मला लहानपणा पासून पाहत आहे आहात. तेव्हा बाहेर सुरू असलेल्या अपप्रचाराला सुज्ञ मतदार राजाने बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी जनतेला केले. पुढे बोलतांना राजे म्हणाले, एटापल्ली तालुक्याच्या भविषयसाठी युवा ,बाल, महिला यांच्या सुंदर भविष्यासाठी आपण भाजपा सरकार पुन्हा निवडून द्या.
 
केंद्रात व राज्यात भाजप सरकार हे भ्रष्टाचारमुक्त आहे .त्यामुळे दिल्ली-अहेरी पर्यंत भ्रष्टाचाराला लगाम लागला आहे त्यामुळे गरीब जनतेला आता त्रास होत नाही.त्यांचे काम वेळेवर होतात. भाजपा सरकार हे गरिबांचे सरकार आहे. जनधन योजना, उज्जवला योजना,मुद्रा ,जन आरोग्य योजनाअश्या अनेक योजना काढून जनतेला सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
आपण गेल्या मागील पंधरा वर्षांपासून ज्यांना निवडून देत होते त्यांनी विकासकामे केलेली नाहीत ते यावेळी भाजपची उमेदवारी मिळावी म्हणून पर्यन्त करीत होते त्यामुळे त्यांची पक्ष निष्ठा किती आहे व जनतेला ते किती उत्तरदायी आहेत ते समजते आहे.आपण पक्षशी एकनिष्ठ ,प्रामाणिक आहो त्यामुळे मला मतदान करा.विरोधी लोकांनी जनतेला मूर्ख बनविण्याचा सपाटा सुरू केला आहे माझ्याविषयी वैयक्तिक अपप्रचार करतात कारण मागील कार्यकाळात त्यांनी काहीही काम केले नाही.लोकांची ते दिशाभूल करीत फिरत आहेत.गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवार पाहिजे की ज्याच्यावर एकही गुन्हा नाही असा उमेदवार पाहिजे?असा प्रश्न विचारतात उपस्थित जनसमुदायातून गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेला उमेदवार पाहिजे असा सूर निघाला.