जावडेकरांनी मागितली बिग बॉसची माहिती

    दिनांक :13-Oct-2019
'बिग बॉस १३' अनेक कारणांनी वादाच्या भोवऱ्यात सापडला असतानाच 'या शोमध्ये नेमके काय चालते, याचा अहवाल आपण माझ्या खात्याच्या अधिकाऱ्यांकडे मागितला आहे. येत्या आठवड्यात हा अहवाल मला प्राप्त होणार आहे आणि त्यानंतरच याबाबत पुढचा निर्णय घेतला जाईल', असे आज केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केले.
 
 
 
'बिग बॉस १३'च्या प्रसारणावर बंदी घालण्याबाबतचा आदेश केंद्र सरकारने काढला आहे का, अशी विचारणा जावडेकर यांच्याकडे पत्रकारांनी केली असता त्यांनी तसा कोणताही आदेश देण्यात आलेला नाही, असे नमूद केले. या शोमधील कंटेंटची तपासणी करून त्याबाबतचा अहवाल सादर करण्यास मी अधिकाऱ्यांना सांगितले आहे, असे जावडेकर म्हणाले.