शिक्षणात एकता आणि नावीन्य

    दिनांक :13-Oct-2019
स्वामी विवेकानंद म्हणतात, शिक्षणाद्वारे आपल्या मेंदूमध्ये भरलेली माहिती म्हणजे ज्ञान नव्हे. कारण यातील बरीच माहिती कुणाचे व्यक्तिमत्त्व घडवण्यात वा समाजोपयोगी नसते. माहिती अशी मिळवा, जी काही प्रमाणावर जगात महत्त्वपूर्ण परिवर्तन आणू शकते.
 
 
 
 
‘शियान युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अॅण्ड टेकनॉलॉजी’ चायना येथे आयोजित ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन सेन्सर नेटवर्क्स अॅण्ड सिग्नल प्रोसेिंसग’ या परिषदेत ‘इन्व्हायटेड स्पीकर’ या नात्याने आमंत्रित करण्यात आलं, तेंव्हा टेलिमेडिसिन रिलेटेड इंटेलिजंट सिग्नल डिटेक्शनवर माझं संशोधनपर कार्य सादर करण्याची आणि ‘आय ट्रिपल ई’च्या कार्याधिकार्‍यांसकट जगभरातील नामवंत अॅकेडेमीशियन्ससोबत थेट भेट घेण्याची संधी प्राप्त झाली, या आनंदापेक्षाही या अतिप्रगत देशाचे काही टेक्नोलॉजिकली अॅडव्हान्स्ड असे प्रकल्प जवळून बघण्याची आणि तिथल्या अभिनव शिक्षणपद्धतीने घडवलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली, याचे समाधान फार मोठे होते.
 
टेलिकम्युनिकेशनच्या फिप्थ जनरेशन डिव्हायसेसमधील संभाव्य अडचणी पार करण्यासाठी डिप लर्निंगमधील ‘सेल्फ ऑर्गनायिंझग फिचर मॅप’ हा कन्सेप्ट अलगॉरिथमच्या माध्यमातून मांडताना मल्टिमीडिया कम्युनिकेशन्समधील क्वालिटी ऑफ सर्व्हिस, सिक्युरिटी, मोबिलिटी, हाय थ्रूपुट, रियल टाइम हाय क्वालिटी व्हिडीओ, इंटरॅक्टिव्ह मल्टिमीडिया आणि हाय स्पीड इंटरनेट सर्व्हिसेसवर किती प्रश्न ऑडियन्समध्ये समरसून बसलेल्या विद्यार्थ्यांमध्ये आहे, हे बघून आनंदाचा आणि आश्चर्याचा धक्काच बसला. ‘क्वालिटी ऑफ सर्व्हिस’ हवी आणि तीदेखील ‘कॉस्ट इफेक्टिव्ह वे’ने, हे त्यांना जणू बाळकडूच मिळालेलं! इंटिग्रेटेड ब्रॉडबँड मल्टिमीडिया सिस्टिम्स जणू यांना सहजशक्य! आणि या सिस्टिमला डीप लर्निंगच्या साहाय्याने इंटेलिजंट बनवण्याची आयडिया आवडल्याने त्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली. इथल्या विद्यार्थ्यांमध्ये असणारा हा उत्साह भारतातील केवळ ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’मधील रिसर्चर्समध्ये आढळला होता!
 
शियान येथील टेराकोटा आर्मी (उत्खननात सापडलेले असंख्य पुतळे म्हणजे सुमारे 8000 सैनिक, एक लाखाच्यावर शस्त्रं आणि घोडे यांच्या प्रतिकृती) हे अतिविशाल म्युझियम दाखवताना ‘‘तुमचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इथे भेट दिली आणि प्रशंसा केली,’’ असं अभिमानाने सांगायला ते विसरले नाही.
 
तुमच्या येथील एज्युकेशन सिस्टीमचे काय वैशिष्ट्य आहे? असं विचारल्यावर एका प्रोफेसरने सांगितलं, चाईल्ड एज्युकेशन असो वा हायर एज्युकेशन, प्रत्येक विद्यार्थी स्किल डेव्हलपमेंटमध्ये सातत्याने स्वतःला बिझी ठेवतो. देशासाठी काहीतरी नावीन्यपूर्ण करण्याच्या प्रयत्नात त्याच्या हातून असे प्रोजेक्टस्‌ बनतात की, प्रॉडक्टच्या रूपाने मार्केटमध्ये येऊन त्यांच्या उपयुक्ततेने लोकप्रिय होतात आणि त्या प्रॉडक्टस्‌ची जगभरात मागणी होते. अशा रीतीने लहान वयातच कितीतरी मुलं आंत्रप्रेन्युअर बनतात, तर काही उद्योगपती. रिसर्च अॅण्ड इनोव्हेशन्स या मुलांसाठी नवीन नाही. ते कल्चर त्यांच्या स्वाभाविकपणे अंगवळणी पडलेले असते.
 
वर्ल्ड इंटेलेक्च्‌युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन (विपो)ने दिलेल्या आकडीवारीनुसार चायनाने फाईल केलेल्या 13,38,503 पेटंट अॅप्लिकेशन्सपैकी कितीतरी अॅप्लिकेशन्स हे शालेय विद्यार्थ्यांचे आहेत, ही वस्तुस्थिती आहे.
 
आपल्या देशात हे का घडून येत नाही? 
संपूर्ण राष्ट्राच्या शाश्वत विकासाच्या मजबूत अशा पायाभरणीसाठी आम्ही विचार केला असता, केवळ मोठमोठ्या आर्थिक उलाढाली आम्हाला अपेक्षित नाही. आमचा उन्नत भारत हा बुद्धिगुणांकाच्या आधारावर जगाच्या पाठीवर ओळखला गेला पाहिजे. देशातील प्रत्येक शाळा- कॉलेजमधून उत्तम शिक्षण मिळून प्रत्येक विद्यार्थ्यांचा बुद्धिगुणांक वाढला पाहिजे, जेणेकरून स्पर्धात्मक आव्हाने झेलण्याची प्रत्येकाची क्षमता बनल्यास आरक्षणाच्या कुबड्या स्वतःहून झुगारण्याची मानसिकता ही आत्मबलातूनच निर्माण होईल, कारण शाश्वतार्थानं विकासमार्गावर धावण्याच्या स्वप्नपूर्तीत त्या केवळ अडथळे असल्याचे वास्तव जेव्हा विस्तवाप्रमाणे मनामनाला जाणवेल, तेव्हाच मन:पटलावरून संवर्धित आभास दूर होऊन महत्त्वाकांक्षेची शिखरं जवळ भासतील.
 
बालकांसाठी, शालेय विद्यार्थ्यांसाठी ट्रान्सफॉर्मेटिव्ह रिफॉर्म्स आणण्याच्या दृष्टिकोनातून येऊ घातलेल्या अभ्यासक्रमात आणि शिक्षणपद्धतीत एकविसाव्या शतकातील आवाहने पेलण्याच्या तयारीसाठी काही महत्त्वपूर्ण प्रॉब्लेम सॉलिंवग स्किल्स, क्रिटिकल िंथिंकग, क्रिएटिव्हिटी, सायन्टिफिक टेम्पर, कोलॅबोरेशन आणि नैतिक मूल्यांच्या पेरणीसकट सामाजिक दायित्वाची जाणीव हे सर्व असल्यास नव्या शैक्षणिक धोरणानुसार येत्या पाच वर्षांत फाउंडेशन लेव्हलवर आमूलाग्र बदल घडून येतील आणि त्याचे लॉंग टर्म इफेक्टस्‌ म्हणजे संभाव्य फलित अत्यंत उत्तम संभवतं.
 
अभियांत्रिकी क्षेत्रात प्राध्यापक म्हणून कार्यरत असल्यामुळे, आमचा दृष्टिक्षेप केवळ हायर एज्युकेशनपुरता मर्यादित ठेवून चालणार नाही. आज अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना सक्षम बनवण्यात आम्ही शिक्षकवर्ग फार जास्त एनर्जी खर्ची घालतोय. याचं कारण म्हणजे अभियांत्रिकी शिक्षण प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातून यातील काही विद्यार्थी मुळात तयार झालेलेच नसतात. त्यांची स्वतःबद्दलची भविष्यकालीन स्वप्नं धूसर असतात आणि त्यामुळे ‘रिसर्च अॅण्ड इनोव्हेशन्स’वर आधारित संकल्प पार पाडताना आम्हाला विशेष परिश्रम घ्यावे लागत आहेत, ज्याचं फलित पाहिजे तसं मिळत नाहीये. ‘मेघे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स’च्या इंटरनॅशनल रिलेशन्स ऑफिसची डेप्युटी डायरेक्टर ही जबाबदारी पार पाडताना अॅकेडेमिक कोलॅबोरेटिव्ह इनिशिएटिव्हज घेतल्यानंतर ‘क्रिएटिव्हिटी अॅण्ड इनोव्हेशन्स इन इंजिनीअरिंग’ या वर्कशॉप सीरिजद्वारे काही विद्यार्थ्यांनी मल्टिडिसिप्लिनरी मेगाप्रोजेक्ट बनवून उल्लेखनीय कार्य करून पेटंटस्‌ फाईल केले. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग विभागात हेड ऑफ द डिपार्टमेंट या नात्याने काम करत असताना माझ्या सहकारी शिक्षकवर्गास मी आवाहन केलं, की केवळ क्लासरूम टीिंचगपुरतं मर्यादित असं आपलं कार्य न ठेवता त्याचा आवाका त्यांनी वाढवावा. फॅकल्टी अॅडव्हायझर या नात्याने त्यांच्यासोबत जे विद्यार्थी वैयक्तिक रीत्या जुळल्या गेले आहेत, त्यांना घडवण्याची सुवर्णसंधी तुम्हाला मिळालेली असून, त्यांना यशोमार्गावर चालवा. त्यांना बोलतं करून त्यांच्या मनावरचा ताण कमी करण्याचा प्रयत्न करा. एकविसाव्या शतकाच्या गरजा लक्षात घेऊन, ‘हायर एज्युकेशन’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ‘क्रिएटिव्हिटी आणि इनोव्हेशन्स’च्या महत्त्वाकांक्षी मार्गावर चालण्याची आवड निर्माण झाली, तर आपोआपच त्यांच्याकडून समाजोपयोगी प्रकल्प बनतील. त्यांच्या नवकल्पनांच्या आधारावर त्यांचा ज्ञानसंग्रह वृिंद्धगत होईल. ‘विद्यार्थ्यांना एम्प्लॉएबल बनवणे’ इतकाच अजेंडा नसावा, िंकबहुना त्यापलीकडे जाऊन व्यक्तिगत पातळीवर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास आणि टेक्निकल जडणघडण होऊन त्यांच्यासाठी नानाविध करियर ऑप्शन्स खुले झाले पाहिजे. त्यांच्यात उद्यमशीलता आणि ग्लोबल स्किल्स डेव्हलप होऊन त्यांनी स्वतःला आंत्रप्रेनोरीयल अॅक्टिव्हिटीमध्ये गुंतवून घेतले पाहिजे; आणि जगाच्या पाठीवर स्वकर्तृत्वाने एक विशिष्ट स्थान प्राप्त करण्यासाठी सक्षम बनले पाहिजे, असा अजेंडा आपल्या कार्यप्रणालीत हवा. संपूर्ण राष्ट्राच्या एकंदरीत वातावरणात विद्वत्त नवचैतन्य यावे, इतक्या व्यापक योजना आखल्या जायला हव्या. या सर्वांना उत्तम प्रतिसाद मिळाला आणि सामान्य भासणार्‍या विद्यार्थ्यांनी असामान्य यश मिळवून दाखवले. ‘नॅशनल असेसमेंट अॅण्ड अक्रेडिटेशन कौन्सिल’ आणि ‘ऑटोनॉमी एक्स्टेंशन’च्या टीमने एकप्रकारे आमच्या डिपार्टमेंटचा आदर्श विभागात समावेश करता येऊ शकतो अशी प्रशंसा केली, यातच सारे काही आले. निश्चितपणे प्रचीती आली की, येऊ घातलेल्या या पर्वाशी आपली विचारधारा आणि कार्यपद्धत, ‘आय यु सी ई ई’ची एक कन्सॉरशियम लीडर आणि एक निष्ठावंत शिक्षक या नात्याने बर्‍याच प्रमाणावर मिळतीजुळती आहे. कित्येक वर्षांपूर्वी इंजिनीअरिंग एज्युकेशन्समधील ट्रान्सफॉर्मेशनचा घेतलेला ध्यास, त्यासाठी गेली कित्येक वर्षं तीन-पाच वर्षांचा रोडमॅप समोर ठेवून अॅक्शन प्लॅन बनवून तो राबवण्यासाठी घेतलेली मेहनत आणि टीिंचग-लर्निंग प्रोसेसमध्ये परिवर्तन आणण्याकरिता केलेली प्रयत्नांची पराकाष्ठा, ही केवळ अभियांत्रिकी क्षेत्रासाठीच नव्हे, तर एकंदरीत उच्च शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल घडवून आणण्याच्या दिशेने पायाभरणीचं काम करू शकते.
 
याआधी उल्लेख केल्याप्रमाणे नैतिक मूल्यांवर आधारलेली एक प्रगल्भ आणि मजबूत अशी ‘एज्युकेशन सिस्टीम’ संपूर्ण राष्ट्राचा सर्वांगीण विकास घडवून आणू शकते. यात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणण्यासाठी प्रत्येक शिक्षक, अॅकेडेमिक लीडर्स आणि विद्यार्थी यांनी सर्व पातळींवर सहयोग दाखवायला हवा. पॉलिसी मेिंकग असो वा इम्प्लिमेंटेशन प्लॅन्स असो, एक अभ्यासपूर्ण, परिपक्व आणि जागरूक दृष्टिकोन ठेवून सर्व बाबींमध्ये आपलीही महत्त्वपूर्ण कामगिरी असू शकते, याची जाणीव ठेवायला हवी, तरच एका अर्थाने एका सुसंस्कृत राष्ट्राच्या प्रगतीत आणि शाश्वत विकासात आपला महत्त्वपूर्ण वाटा आहे, ही भावना प्रत्येकाला आत्मसन्मानपूर्वक जगायला उद्युक्त करेल. शिक्षणक्षेत्र सर्वार्थाने ‘स्वच्छ’ असावं ही प्राथमिक अपेक्षा ठेवली, तर सुरुवात वैयक्तिक पातळीवर होते. भ्रष्टाचार समूळ उखडून काढल्यास सामाजिक, सांस्कृतिक, कलात्मकदृष्ट्या, वैज्ञानिक, तांत्रिक आणि आर्थिकदृष्ट्या समृद्ध असे राष्ट्र, आपल्याला प्राप्त झालेली लोकशाही निश्चितपणे उपभोगता येऊ शकेल. लोकशाही आपल्याला काही मूलभूत हक्क प्रदान करते आणि संविधानाद्वारे आवाहित आपली कर्तव्यभावना सामाजिकदृष्ट्या कृतिशील ठेवली. सुसंस्कृत आणि मानवतावादाचे खर्‍या अर्थाने पुरस्कर्ते असे राष्ट्र आपण निर्माण करू शकू. ज्यात नवकल्पना, नवनिर्मितीसाठी स्वातंत्र्य, संधी, समानता आणि न्याय मिळेल.
 
शिक्षणक्षेत्रात आपल्याला निश्चितपणे दर्जात्मक परिवर्तन अपेक्षित आहे आणि हे सर्व ‘इन्हेरेंट’ तेव्हाच अपेक्षित आहे जेव्हा ‘फाउंडेशन ऑफ लर्निंग’ नैतिक मूल्यांवर आधारित असे असेल.
 •डॉ. शुभांगी रथकंठीवार
9764996797
 
(स्तंभलेखिका ‘इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग’च्या प्राध्यापिका आणि प्रथितयश साहित्यिक आहेत.)
••