प्रवाशाचा एसटीमध्ये हृदय विकाराच्या धक्याने मृत्यू

    दिनांक :13-Oct-2019
मानोरा,
तालुक्यातील पोहरादेवी येथील शेतकरी दत्तराम डोळस यांचा एसटी बसमध्ये प्रवासादरम्यान हृदय विकाराच्या तीव्र धक्याने मृत्यू झाला. ही घटना आज, 13 ऑक्टोबर रोजी सकाळी घडली.
 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, पोहरादेवी येथील दत्तराम डोळस हे सकाळी दिग्रस कल्याण या बसने सावरगाव कान्होबा येथे पोर्णिमानिमित्त दर्शनासाठी जात असताना ग्राम जोगलदरी जवळ त्यांच्या छातीत दुखायला सुरवात झाली. छातीमध्ये होणार्‍या वेदना असय्य झाल्याने ते उपचारासाठी अकोला ते दिग्रस या बसने परत माघारी फिरले. दरम्यान मानोर्‍या जवळ बसमध्येच त्यांचा मृत्यू झाला. मनमिळावू स्वभावाच्या दत्तराम यांचेकडे 6 एकर शेती आहे. त्याच्या या आकस्मिक निधनाने पोहरादेवी परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, दोन मुली व बराच मोठा आप्त परिवार आहे.