राफेल, लिंबू आणि गंधपुष्प...

    दिनांक :13-Oct-2019
मंथन
भाऊ तोरसेकर 
विजयादशमीचा मुहूर्त साधून, देशाचे संरक्षणमंत्री राजनाथिंसह यांनी फ्रान्सला जाऊन ताब्यात मिळणार्‍या पहिल्या राफेल लढाऊ विमानाचे रीतसर पूजन केले. तत्काळ आपल्या देशातील उथळ पुरोगामी विज्ञानवादी बुद्धिमंतांच्या व राजकारण्यांच्या अकलेला चालना मिळाली. सध्या महाराष्ट्रात निवडणुका लागलेल्या असल्याने, इथे बारीकसारीक गोष्टींना अतिशय प्रसिद्धी मिळत असते. त्यामुळे िंसह यांनी फ्रान्समध्ये राफेल विमानाची केलेली पूजा, चर्चेचा िंकवा िंटगलीचा विषय करण्यात आला. बुद्धिमंत लोक एकवेळ समजू शकले असते. पण, कॉंग्रेसच्या िंकवा राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांनीही त्यावर टिप्पणी करावी, याचे नवल वाटले. अर्थात, त्यात कुठलीही नवलाई नाही. वाहत्या गंगेत हात धुवून घेण्यालाच धूर्तपणा समजणार्‍यांच्या जगात असे विज्ञानवादी असंख्य प्रमाणात जन्माला येत असतात. त्यामुळे विमानाच्या चाकापाशी चिरडायला ठेवलेली िंलबे आणि विमानाच्या वर ठेवलेला नारळ, अनेकांना खुपला असेल. पण, अशा बाबतीत टीव्ही कॅमेरासमोर येऊन टवाळी करणार्‍यांच्या प्रतिक्रिया टिपणार्‍यांची बुद्धी कुठे चक्कर येऊन पडली होती, त्याचे नवल वाटते. कारण ज्या राजकीय नेत्यांनी राफेलच्या पूजेसाठी नाके मुरडली, त्यापैकी कोणत्याही प्रमुख पक्षाच्या कुठल्याही उमेदवाराने पितृपक्ष चालू असताना उमेदवारी अर्ज का भरलेले नव्हते? असा प्रतिप्रश्न एकाही शहाण्या पत्रकाराला कसा सुचला नाही? महाराष्ट्रात 27 सप्टेंबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. पण, 29 तारखेपर्यंत पितृ पंधरवडा चालू होता, तोपर्यंत कुठल्याही मोठ्या पक्षाच्या उमेदवाराने अर्ज का दाखल केला नाही? महाराष्ट्रात पितृपक्ष हा कालावधी कुठल्याही शुभकार्यासाठी अपशकुनी मानला जातो. ही अर्थातच श्रद्धा िंकवा पुरोगामी अंधश्रद्धा आहे. त्यामुळे ज्यांना विज्ञानवादाची खुमखुमी आहे, त्या पुरोगामी पक्षांनी तरी आपल्या उमेदवारांना त्याच कालखंडात अर्ज दाखल करण्याची सक्ती करायला काय हरकत होती?
 
 
 
भाजपा िंकवा शिवसेना हे िंहदुत्ववादी पक्ष असल्याने, त्यांनी हा अशुभ काळ पथ्य म्हणून पाळला तर समजू शकते. पण, ज्यांना राफेल विमानाच्या पूजेची वा चाकाखाली िंलबू ठेवण्याची लाज वाटली; त्यांना पितृपक्षात अर्ज भरायची भीती का वाटली असावी? त्याचे कारण राजनाथ यांना जे वाटले, त्यापेक्षा िंकचितही वेगळे नाही. आपल्या बाबतीत असे काही नसल्यावर कुणीही हाडाचा पुरोगामी अथवा विज्ञानवादी असतो. पण, विषय आपल्या घरातला वा जीवनातला असल्यावर मात्र बहुतांश विज्ञानवादी अंधश्रद्ध होऊन जातात. त्याचा कुठलाही गाजावाजा होऊ दिला जात नाही. िंकबहुना गुपचूप आपापल्या अंधश्रद्धा जपल्या जातात. त्याचे चित्रण कुठल्या कॅमेराने होणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली जात असते. त्यामुळे त्यांची झाकलेली मूठ सवा लाखाची असते. पण, अधूनमधून कुठे छुपा कॅमेरा समोर आला, तर मग त्यांची झाकली मूठही उघडी पडते. याचे शेकडो किस्से सांगता येतील. आज उत्तरप्रदेशात योगी आदित्यनाथ नावाचा, धार्मिक पथ्ये पाळणारा मुख्यमंत्री आहे आणि त्याला मुहूर्त व धर्मकर्मकांड करण्याची बिलकुल लाज वाटत नाही. पण, धर्माच्या शास्त्रापलीकडे ज्याला निव्वळ समजुती व अंधश्रद्धा मानले जाते, त्याला मात्र योगी कवडीचीही िंकमत देत नाहीत. त्यांनी मुख्यमंत्री असताना नोएडाला जाण्याची िंहमत केलेली आहे. मात्र, त्यांच्या आधी जे दोन पुरोगामी मुख्यमंत्री उत्तरप्रदेशाला लाभलेले होते, त्यांना कधी अशा अंधश्रद्धेला आव्हान देण्याची िंहमत झालेली नव्हती. गेल्या दोन-तीन दशकांपासून उत्तरप्रदेशच्या राजकारणात अशी ठाम समजूत आहे, की जो मुख्यमंत्री नोएडा नामक औद्योगिक परिसराला भेट देतो वा तिथे कार्यक्रम करतो, त्याची सत्ता जाते. म्हणून मायावती वा अखिलेश यांनी आपल्या पाच वर्षांच्या कालखंडात चुकूनही त्या भागात कुठला कार्यक्रम योजला नाही वा तिकडे फिरकले नाहीत. अर्थात, त्यामुळे त्यांना सत्तापद गमावण्यापासून सवलत मिळाली नाहीच.
 
 
थोडक्यात सांगायचा मुद्दा इतकाच, की पुरोगामी म्हणून मिरवणारे अधिक अंधश्रद्ध असतात. िंकबहुना पुरोगामित्व मिरवायचे म्हणून असल्या इतरांच्या वागण्याला नाके मुरडणे, ही आजकाल फॅशन झालेली आहे. तसे नसते, तर रामलीला मैदानावर डॉ. मनमोहन िंसग िंकवा सोनिया-राहुल तरी रावणाला बाण मारायला कशाला गेले असते? त्यांच्या प्रतिकात्मक बाण सोडण्याने कुठला रावण मेला नाही, िंकवा दिल्लीतल्या रावणवृत्तीला वेसण घातली गेली नाही. पण, त्यांनाही मतांसाठी असली लाचारी करावी लागली. लोकसभा निवडणुकीत मते हवी म्हणून राहुल गांधी जानवेधारी ब्राह्मण असल्याचा डंका पुरोगाम्यांनीच कशाला पिटला असता? असे लोक अधिक भंपक विज्ञानवादी असतात. राजनाथ यांनी राफेल विमानाची विधिवत्‌ पूजा केली असेल आणि िंलबू-मिरची त्याला बांधली असेल, तर बिघडत नाही. निदान त्यांची असल्या गोष्टींवर श्रद्धातरी असेल. पण, राहुल िंकवा त्यांच्या ब्राह्मण्याचे कौतुक सांगणार्‍यांचे काय? नुसता ब्राह्मण नाही, तर जानवेधारी ब्राह्मण असल्याचे कौतुक करणारेच आता राफेल विमानाच्या पायाशी असलेल्या िंलबासाठी नाक मुरडतात ना? हा सार्वत्रिक प्रकार असतो. अनेक पुरोगामी निवडणुका िंजकण्यासाठी तिरुपती वा तत्सम देवस्थानाच्या पायर्‍या झिजवीत असतात. तेव्हा यापैकी किती जणांनी नाके मुरडलेली असतात? अर्थात अशा वादाला तोंड फुटले, म्हणजे त्याला काटशह देणार्‍या अंधश्रद्धांचेही पुरावे समोर आणले जातात. सोशल मीडियात लगेच अवकाशयानात भ्रमण करणार्‍या अंतराळवीरांच्या अंगावर होली वॉटर िंशपडले जाण्याचेही व्हिडीओ तत्काळ शोधून टाकलेले आहेत. तोही मूर्खपणाच आहे. कारण जशी ज्यांची श्रद्धा िंकवा समजूत असेल, तसेच कुठल्याही देशातील व समाजातील लोक वागत असतात. ज्यांना कुठल्याही श्रद्धा चुकीच्या वाटतात, तेही एकप्रकारे श्रद्धाळूच लोक असतात. देव नाही म्हणणारेसुद्धा देव नसल्याचा कुठलाही पुरावा देऊ शकत नसतात. अमुक नसल्याचा दावा फक्त करतात. तीही एक अंधश्रद्धाच असते ना? भाजपा िंकवा संघ जातीयवादी असल्याची एक अंधश्रद्धा किती काळ आपल्या बौद्धिक प्रांतामध्ये बोकाळलेली आहे?
 
 
गेल्या उत्तरप्रदेश विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल लागल्यावर, मायावतींनी मतदान यंत्रावर शंका घेतली आणि तमाम पुरोगामी अंधश्रद्धाळूंनी त्यांना उचलून पालखीत बसवले ना? ते यंत्र हॅक होऊ शकते िंकवा त्यात घोटाळा करता येतो, हे शास्त्रशुद्ध रीतीने सिद्ध करण्याचे निवडणूक आयोगाचे आव्हान यापैकी एकही पुरोगामी विज्ञानवादी स्वीकारू शकला आहे काय? पण, त्याचा गवगवा किती जोरात चालू आहे? कुठलाही पुरावा नसताना िंकवा कुठेही सिद्ध झालेले नसतानाही छातीठोकपणे ईव्हीएम वाद उकरून काढणारे थोडे आहेत का? कुणीतरी सांगितले, कुठेतरी ऐकले, अशा गावगप्पांच्या आधारे ईव्हीएम यंत्राविषयी गावगन्ना अफवा पिकवीत सुटलेले शरद पवार विज्ञानवादी आहेत? असतील तर राफेल विमानाच्या पायाशी िंलबू ठेवणारे राजनाथही विज्ञानवादीच असतात. कारण पवार िंकवा तत्सम लोक ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवतात आणि राजनाथिंसह यांनी ऐकलेल्या अपशकुनाच्या वा अशुभाच्या संकेतांना मानलेले आहे. हातात फलक घेऊन कुणी दाभोळकरांच्या खुन्याला पकडण्यावर आंधळा विश्वास ठेवत असेल, िंकवा सेमिनार भरवून कलबुर्गी वा अन्य कुणाला न्याय मिळत असेल, तर िंलबू चिरडल्याने राफेल विमानाला वाईट नजर लागणार नाही, यावर विश्वास कशाला ठेवायचा नाही? श्रद्धा तुमची असली तर खरी आणि आमची असली तर आंधळी; असे कुठल्याही शास्त्रात िंकवा विज्ञानात सांगितलेले नाही. ज्यांना साधे पितृपक्षात निवडणुकीचे अर्ज भरण्याची िंकवा आपापल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्याची िंहमत होत नाही, त्यांनी राजनाथ यांच्या पूजेला िंकवा िंलबांना नाक मुरडण्याची गरज नाही. मदर तेरेसांच्या भोंदूगिरीवरचा संपादकीय लेख शेपूट घालून मागे घेणार्‍या बुद्धिमंत व संपादकांना तर मुरडायला नाकसुद्धा असू शकत नाही. असते तर त्यांची अशी केविलवाणी परिस्थिती कशाला झाली असती? जे पितरांच्या आत्म्याला घाबरून जगतात, त्यांनी िंलबाला हसायचे कारण आहे काय?